यावल नगरपरिषद अतिरिक्त साठवण तलावाच्या कामाची न्यायालयीन चौकशी झाल्यास फिर्यादी हेच आरोपी होऊ शकतात

0
13
यावल नगरपरिषद अतिरिक्त साठवण तलावाच्या कामाची न्यायालयीन चौकशी झाल्यास फिर्यादी हेच आरोपी होऊ शकतात

यावल, प्रतिनिधी । यावल नगरपरिषदेने बांधकाम केलेल्या अतिरिक्त साठवण तलावाच्या बांधकामात गैरप्रकार,भ्रष्टाचार झाल्याची तक्रार अध्यक्षा सौ.नौशाद तडवी यांनी व त्यांच्या काही मोजक्या सहकारी नगरसेवकांनी केली असली तरी न्यायालया मार्फत चौकशी झाल्यास फिर्यादी हेच आरोपी होऊ शकतात तसेच यावल नगरपरिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती म्हणून आरक्षण असल्याने तसेच अनुसूचित जमातीच्या अध्यक्षा सुरेखा कोळी या अपात्र ठरल्याच्या कारणावरुन अध्यक्षपद रिक्त झाले होते.

त्यानंतर नगरपरिषद सदस्यांमध्ये एकमेव असलेल्या अनुसूचित जमातीच्या सदस्या सौ.नौशाद मुबारक तडवी यांच्या निवडीसाठी मी स्वतः तसेच नगरसेवक राकेश कोलते अनुक्रमे सूचक,अनुमोदक झालेले आहेत त्यामुळे त्यांच्याबाबत कधी गैरसमज, मतभेद नव्हते आणि नाहीत.तरी सुद्धा त्यांनी अतिरिक्त साठवण तलाव बांधकामाबाबत खोटी तक्रार करून तसेच यावल शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन बिनबुडाचे आरोप करून यावल नगरपरिषदेची बदनामी केलेली आहे ते आम्ही खपवून घेणार नाही तसेच यावलकरांना वस्तुस्थिती माहिती करण्यासाठी आम्ही आमच्या चांगल्या कामाची बाजू मांडत आहोत अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत नगरपरिषदेचे गटनेते तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी व्यक्त केली.

येथील नगराध्यक्ष सौ.नौशाद मुबारक तडवी यांनी व त्यांच्या काही मोजक्या नगरसेवकांनी केलेले अतिरिक्त साठवण तलाव बांधकामात भ्रष्ठाचाराचे आरोप हास्यास्पद असुन त्यावर भारतीय जनता पक्षाने भ्रष्ठाचाराच्या आरोपा विषयाची सखौल माहीती न घेता नगराध्यक्ष यांना दिलेले समर्थन म्हणजे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना असेच म्हणावे लागेल.

यावलकरांना भविष्यात पाणी पुरवठा बाबत समस्या,अडचण निर्माण होऊ नये म्हणून तसेच जुन्या साठवण तलावात गाळ साचल्यामुळे,आणि पाण्याची गळती वाढल्याने,पाणी पुरवठा कमी पडू नये म्हणून अतिरिक्त साठवण तलाव बांधकाम करण्यासाठी आम्ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून प्रशासकीय मान्यता घेऊन कामाबाबत मुख्याधिकारी यांच्यामार्फत कार्यारंभ आदेश काढलेला होता आणि आहे. कार्यारंभ आदेश काढतानाच नगरपालिकेतुन वेगवेगळे जावक नंबर असलेले एकाच मजकुराचे दोन कार्यारंभ आदेश कोणी व का काढले तेथूनच वैयक्तिक स्वार्थ निदर्शनास आला होता आणि आहे.पाण्याची साठवण क्षमता कमी झाल्यामुळे शहराला येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याची उणीव भासु नये या दृष्टीकोणातुन सत्ताधारी गटाचे गटनेते तथा नगरसेवक अतुल पाटील यांच्या मार्गदर्शन व नेतत्वाखाली नगराध्यक्ष सौ. नौशाद मुबारक तडवी व त्यांच्या सहकारी सर्व नगरसेवकांनी मिळुन विकासाचा विधायक दृष्टीकोण समोर ठेवुन गावाला येणाऱ्या कालखंडामध्ये मुबलक पाणीपुरवठा व्हावा याकरीता शर्तीचे पर्यंत करून नगर परिषदेने सुमारे2कोटी84 लक्ष रुपयांचे अतिरिक्त साठवण तलावास मंजुरी मिळवली व सदरचे काम पुर्णत्वास आले असता,चार दिवसापुर्वी नगराध्यक्ष सौ.नौशाद मुबारक तडवी व त्यांच्यासह चार नगरसेवकांनी जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्याकडे सदरचे साठवण तलावाच्या कामात मोठा भ्रष्ठाचार करण्यात आल्याची लेखी तक्रार केली. याविषयाला आता राजकीय रंग दिला जात आहे.भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद मध्ये या अतिरिक्त साठवण तलावात झालेल्या भ्रष्ठाचाराची चौकशी व्हावी या नगराध्यक्ष यांच्या मागणीला समर्थन देण्यात आले. हे बिनबुडाचे आरोप जनतेसमोर येण्यासाठी दि.30 रोजी सकाळी सत्ताधारी गटातील गटनेते तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी त्यांच्या गटातील सर्व 11 सदस्याना सोबत घेवुन पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष सौ.नौशाद तडवी यांनी केलेल्या अतिरिक्त साठवण तलावातील उभारणीत झालेल्या कामात भ्रष्टाचारा विषयी गंभीर आरोप लावुन याची न्यायालयामार्फत तात्काळ चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

पत्रकार परिषदेत
उपनगराध्यक्ष अभीमन्यु चौधरी, नगरसेवक प्रा.मुकेश येवले, राकेश कोलते,शेख असलम शेख नबी,समिर शेख मोमीन, नगरसेविका सौ.देवयानी धिरज महाजन,सौ.रेखा युवराज चौधरी, सौ.पोर्णीमा राजेन्द्र फालक,शिला श्रीधर सोनवणे,सौ.कल्पना दिलीप वाणी,सौ.रूख्माबाई भालेराव उर्फ़ महाजन यांना सोबत घेवुन,सदरील अतिरिक्त साठवण तलावाच्या उभारणी कामात मोठया प्रमाणात झालेल्या भ्रष्ठाचाराच्या आरोपांना फेटाळुन लावले.नगराध्यक्ष सौ.नौशाद तडवी यांच्या संपुर्ण देखरेख व आदेशाव्दारे पुर्णत्वास आलेल्या तलावाची त्यांनीच भ्रष्ठाचार झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करावी हे संपुर्ण विषय हास्यास्पद तर आहेच पण यातुन यावल शहराच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या नगरसेवकांच्या विश्वासाची प्रतिमा मलीन करण्याचा हे एक प्रकारे राजकीय षड्यंत्र असल्याची माहीती या वेळी पत्रकार परिषद मध्येे देवुन या सर्व प्रकाराची उच्चस्तरिय न्यायलयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी ही आपण जिल्हाधिकारी यांच्या कडे करणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलतांना गटनेते अतुल पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here