यावल देशातील चौथ्या क्रमांकावर कचरा मुक्त शहर

0
42

राष्ट्रपतीकडून तडवी यांना पुरस्कार, स्वच्छ भारत अभियानात चमकली यावल नगरपालिका

यावल, प्रतिनिधी । स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरा मुक्त शहर (जीएफसी)या केंद्र शासनाच्या स्पर्धेमध्ये यावल नगरपरिषदेने संपूर्ण भारत देशात चौथा क्रमांक पटकाविला.दिनांक 20 शनिवार रोजी दिल्लीत एका शासकीय समारंभात यावलच्या नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत भारत सरकारच्या आवासन आणि शहरी कार्य मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या हस्ते सन्मानित करून गौरव करण्यात आला.

स्वच्छ भारत अभियान 2021अंतर्गत कचरा मुक्त शहर (G.F.C)या केंद्र शासनाच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत देशपातळीवर चौथा (4) गुणाक्रम प्राप्त करत नगरपरिषद यावलचा दि.20नोव्हेंबर2021रोजी महामहिम राष्ट्रपती मा.रामनाथ जी कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय सचिव आवासन आणि शहरी कार्य मंत्रालय नवी दिल्ली यांच्या हस्ते यावल नगरपरिषदेचे नगराध्यक्षा सौ.नौशाद मुबारक तडवी व योगेश मदने अभियंता न.पा.यावल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला सदर पुरस्कार विज्ञान भवन नवी दिल्ली येथे दिमाखदार व भव्यदिव्य अश्या समारंभात प्रदान करण्यात आला.

कचरा मुक्त शहर(G.F.C.) या स्पर्धेत शहरातील भौतिक व कागदोपत्री कार्यालयीन स्तरातील कामाची तपासणी व मूल्यांकन शासनाने नेमलेल्या त्रयस्थ समिती मार्फत करण्यात आले होते. आणि तसा प्रस्ताव तयार करण्यात आला होता त्यानुसार भारत देशात यावल नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियानात चमकदार कामगिरी केली.

नगराध्यक्षांची प्रतिक्रिया. पुरस्कार मिळाल्याने मी अत्यंत आनंदित व उत्साहित आहे.या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय मी यावल शहरातील नागरिक बंधू भगिनींना देते.तसेच नगरपरिषदेच्या सर्व सफाई कामगार कर्मचारी व स्वच्छता विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी व तत्कालीन यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांना देते.तसेच उपनगराध्यक्ष,व सभापती स्वच्छता विभाग व सर्व नगरसेवक व नगरसेविका यांच्या सह सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळेच आज यावल शहराचे नाव देश पातळीवर गेले.व नगरपरिषदेला एवढा मोठा सन्मान मिळाला,त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानते.

शनिवार दि.2021रोजी राष्ट्रपती कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय सचिव आवासन आणि शहरी कार्य मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या हस्ते यावल नगरपरिषद अध्यक्षा नौशाद मुबारक तडवी व अभियंता योगेश मदने यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार समारंभ विज्ञान भवनात संपन्न झाला.यावल नगरपरिषदेला म्हणजेच यावल शहराला देशात चौथे कचरा मुक्त शहर म्हणून पुरस्कार प्राप्त झाल्याने पुरस्कार प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व यंत्रणेचे कौतुक करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here