यावल तालुक्यात वाळू माफिया यांची मुजोरी कायम

0
10

यावल, प्रतिनिधी । यावल तालुक्यात डंपर वाहनातून अवैध वाळू वाहतूक सर्रासपणे सुरू आहे यावल तहसीलदार यांनी आज स्वतःआपल्या महसूल पथकासोबत अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
काल मंगळवार दि.28रोजी संध्याकाळी यावल येथे आठवडेबाजाराजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर (नंबर प्लेट नसलेले ) व (चेसेस नंबर) स्वत: खोडलेल्या डंपरवर यावल तहसीलदार महेश पवार यांनी व त्यांच्या महसूल पथकाने पकडून पुढील कारवाई केली,डंपर चालकाचे चालकाचे नाव रतिलाल मच्छिद्र सांळुखे राहणार कोळन्हावी असे आहे तरी यावल महसुल विभागाने डंपर चालकास ताब्यात घेतले आहे तहसिलदार महेश पवार,फैजपुर मंडळ अधिकारी एम.एच.तडवी,अंजाळे तलाठी एस.व्ही.सुर्यवंशी,यावल तलाठी ईश्वर कोळी,परसाडे येथिल तलाठी समीर तडवी, दहिगाव तलाठी व्ही बी नागरे, टाकरखेडा येथील तलाठी बांभुळकर,डोंगर कठोरा तलाठी वसीम तडवी यांनी ही संयुक्त कारवाई केली.अवैध वाहतूक करणाऱ्या या डंपर मध्ये अंदाजे दोन ब्रास वाळू अंदाजे सरकारी किंमत चार हजार रुपये इतका होता पंचनामा करून डंपर यावल पोलिसांच्या ताब्यात दिले असून याबाबत यावल पोलीस स्टेशनला दिले.रात्री १० वाजता गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे यावल तहसीलदार महेश पवार हे आपल्या महसूल कर्मचाऱ्यांसोबत पहिल्यांदाच अवैध गौण खनिज अवैध वाळू वाहतूकदारा विरुद्ध कारवाई करण्यासाठी रिंगणात उतरल्याने महसूल कर्मचाऱ्यांना मध्ये समाधानकारक रित्या बोलले जात असून अवैध वाळू वाहतूक धारांमध्ये मोठी खळबळ उडाली.
यावल तालुक्यात अवैध वाळू वाहतूक ही सर्वात जास्त डंपर द्वारेच होत असल्याने या डंपर चालकांविरुद्ध महसूल विभागाने ठोस निर्णय व वेगवेगळे पथक शासकीय वाहनावर द्वारे नेमून कडक कारवाई करावी असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.
यावल तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन करून अवैध वाळू,गिरावल,खडी,गिट्टी, डबर,मुरूम,माती दगड,गोटे अनाधिकृत वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे याकडे सुद्धा यावल तहसीलदार महेश पवार यांनी आपले लक्ष केंद्रित करून कारवाई करावी असे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here