यावल, प्रतिनिधी । तापी नदीच्या किनारपट्टीवर म्हणजे यावल तालुका महसूल कार्यक्षेत्रात तापी नदीच्या आजूबाजूस मोठा विस्तीर्ण गौण खनिजाचा साठा असल्याने या ठिकाणी दिवस-रात्र गौण खनिजाचे हजारो ब्रास उत्खनन करण्यात येत असून संबंधित स्टोन क्रशर धारक यावल तहसील मधून नाम मात्र गौण खनिज परवाना उपलब्ध करून घेत असून प्रत्यक्षात मात्र वाजवीपेक्षा जास्त गौण खनिजाचे उत्खनन करून कोट्यवधी रुपयांची कमाई करून घेत असल्याचे यावल रावेर तालुक्यात बोलले जात आहे.
यावल तहसील कार्यालयात म्हणजे यावल तालुका महसूल कार्यक्षेत्रात,अंजाळे,अकलूद,
कासवा शिवारात एकूण फक्त एकूण अकरा स्टोन क्रशर धारक मालक-चालक यांची नोंदणी झाल्याचे यावल तहसील कार्यालयात नोंद आहे.यात अनुक्रमे मनमोहन लालचंद लाहोरी,गणेश शिवाजी रावडे, संजय सोनू बडे,बी.एन.अग्रवाल. विलास जवरे मूळ मालक दिनेश रत्नाकर पावसे,सुभाष महारू सपकाळे,कृष्णा सुपडू सपकाळे, सतिंदरसिंग ब्रिजमोहन आनंद, अनंता जगन्नाथ चिंचोले,विकास वाल्मीक सपकाळे यांची स्टोन क्रशर धारक म्हणून नोंदणी यावल तहसील कार्यालयात आहे हे गौण खनिज उत्खननासाठी यावल तहसील कार्यालयातून नियमानुसार रीतसर गौण खनिज परवाना काढत असतात. आणि संपूर्ण यावल रावेर तालुक्यात जिल्ह्यातील ग्राहकांच्या मागणीनुसार उत्खनन केलेल्या गौण खनिज याचे वितरण करीत आहेत.
विविध शासकीय बांधकामे, रस्ते,गटारी,पुल मोठमोठे, बिनशेती केलेल्या जागांवर रस्ते, गटारी इत्यादी कामांसह इतर अनेक प्रकल्पाचे बांधकामे जोरात सुरू आहेत सर्व ठिकाणी किती प्रमाणात गिट्टी मुरूम वाळू माती दगड गोटे डबल किती प्रमाणात किती ब्रास लागते हे सर्वांना ज्ञात आहे.
यापैकी काही टोन क्रशर चालक मात्र यावल तहसील कार्यालयात नाममात्र गौण खनिज परवाना काढून प्रत्यक्ष जागेवरून हजारो ब्रास गौण खनिजाचे उत्खनन करून सोईनुसार मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे वितरण आणि वाहतूक ठराविक आपले ट्रॅक्टर,डंपर इत्यादी अत्याधुनिक वाहनातून सर्रास पाणी दिवस-रात्र वाहतूक करीत आहेत.
याबाबत फैजपुर प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी यावल तहसीलदार व आपल्या महसूल यंत्रणेमार्फत तापी नदी परिसरात व किनारपट्टी भागात प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन चौकशी पंचनामे करून प्रत्यक्षात गौण खनिजाचे उत्खनन किती झाले आणि गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांनी यावल तहसीलला किती रॉयल्टी भरली आहे याची चौकशी केल्यास फार मोठे अवैध गौण खनिज उत्खननाचे रॅकेट उघडकीस येईल असे संपूर्ण यावल रावेर तालुक्यातील जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.