Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचा मनमानी कारभार
    यावल

    यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचा मनमानी कारभार

    saimat teamBy saimat teamDecember 27, 2021Updated:December 27, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आपला मनमानी कारभार करीत असून व्यापाऱ्यांनी आपले अनुज्ञा प्ती व्यापारी लायसेन्स नुतनीकरण ( रिनिव्हल ) करण्यासाठी आतापर्यन्त दोनशे रुपये फि लागत होती तिच फि कृउबा समितीने पाच हजार रुपये केल्याने ती फि व्यापाऱ्यांना परवडणारी नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून संताप व्यक्त करुन नाराजीचे सुर निघत आहे .

    याबाबत अधिक माहिती अशी की , गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमध्ये व्यापारींसह शेतकऱ्यांचे आर्थिक मोठे नुकसान झाले त्यात नुकतेच निसर्गाच्या लहरीपणा व अवकृपेने अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून त्याचा परिणाम उत्पादन कमी झाले आहे त्याची झळ व्यापारी वर्गाला बसली आहे या सर्व बाबीचा विचार करता कृउबा समितीने कोणतीही जनरल सभा न बोलविता अवाढाव्य लायसन्स नुतनीकरण फी वाढीला निर्णय हा चुकीचा आहे . त्यासाठी व्यापाऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते परंतू त्यांनी तसे न करता दोनशे रु . फि चे पाच हजार हे अयोग्य ते व्यापाऱ्यांना मान्य नाही . त्यासाठी बाजार समितीला प्रत्यक्ष भेटून वारंवार तोंडी व लेखी निवेदनाद्वारे फी कमी करणेसाठी पत्र दिले आहे परंतू त्याचा काही एक फायदा झालेला नाही तरी वरील परिस्थितीचा विचार करता अनुज्ञाप्ती नुतनीकरण ( लायसेन्स रिनिव्हल ) फी वाढ ही त्वरीत रद्द करून व्यापाऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे .
    तसेच अन्य तालुक्यातील बाजार समितीप्रमाणे यावल बाजार समितीमध्ये शेतकरी , व्यापारी , हमाल निवास , संडास, बाथरूम , मुतारी, पिण्यासाठी पाणी , सुरक्षा भिंत , माल ठेवण्यासाठी शेड , कॉक्रीटीकरण केलेले नाही यासर्व सेवा सुविधा समितीला देणे गरजेचे असतांना बाजार समिती या सुविधा देत नाही तरी तालुक्यातील भुसारमालाचे केळी , कांदा , गुरेढोरे व्यापारी नियमितपणे आतील व बाहेरील मार्केट फि पावती देत असतांना वरील सुविधा उपलब्ध नसतांनाही एवढी फी वाढविण्याचे कारण काय ? तसे बाजार समितीला शासनाचे आदेश आहे का ? आणि जर आदेश आहे तर व्यापाऱ्यांना विश्वासात न घेण्याचे कारण काय ? दोनशेचे पाच हजार फि वाढ झाल्याने व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होणार असल्याने ती बाजार समितीने कमी करावी अन्यथा त्यासाठी वरिष्ठ स्तरावर न्याय मागणार असल्याचे यावल तालुका ग्रेन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक चौधरी यांनी दिलेल्या पत्रात इशारा दिला आहे .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.