यावल कृउबा समिती संचालक मंडळास मुदतवाढ

0
40

यावल ः प्रतिनिधी
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास सहा महिन्याची मुदत वाढ देण्यात आल्याचा आदेश राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयातून काढण्यात आला आहे. मुदतवाढ मिळणे कामी माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे, आ.लताताई सोनवणे, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी शासनाकडे सततचा पाठपुरावा केल्यामुळे मुदतवाढ मिळाल्याने यावल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळातर्फे त्यांच्यासह राज्यशासनाचे आभार मानण्यात आले.
गेल्या वर्षी दि.८ सप्टेंबर २०२० रोजी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत संपलेली असताना संचालक मंडळास दोन टप्प्यात एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. शासनाने १० सप्टेंबर २०२० रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसंदर्भात आधी २४ सप्टेंबर २०२० पर्यंत निर्णय राखून ठेवला परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दि.१७ सप्टेंबर २०२० रोजी सहा महिने मुदत वाढ देण्यात आली होती ती मुदतवाढ मार्च २०२१ मध्ये संपणार होती. मात्र, पुन्हा राज्यात कोरोनाचा फैलाव वाढल्याने दि.८ मार्च २०२१ रोजी सहकार मंत्रालयातून नवीन आदेश काढण्यात आला आणि पुढील सहा महिन्यासाठी मागील संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली आहे.
आता पुढील ६ महिने पुन्हा तेच संचालक मंडळ कामकाज करणार आहेत. कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांच्या स्वाक्षरीने आदेश काढले आहेत. सध्या शिवसेनेचे मुन्ना पाटील बाजार समितीचे सभापती म्हणून कामकाज बघत आहेत. या निर्णयाने संचालक मंडळात पुन्हा उत्साह निर्माण झालेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here