फैजपूर प्रतिनिधी (उमाकांत पाटील सर)
फैजपूर पोलिसांनी यावल किनगाव मार्गावर हॉटेल जलसा शेजारी मोकळ्या जागेत बेकयादेशीर देशी व विदेशी दारू विक्री करणाऱ्या तरुणाला अटक,त्याच्याकडून ८ हजार ९०० रुपये किमतीचा माल हस्थागत केला असून.यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फैजपूर पोलीस ना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार हॉटेल जलसा शेजारी मोकळ्या जागेत संशयित आरोपी दीपक मधुकर माळी (वय – ३७ , रा .फुले मुजुमदार नगर, साखळी ता.यावल ) हा बेकायदेशीर देशी व विदेशी दारूची विक्री करत आहै .
गुरवारी दुपारी उपविघागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे याच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक फोजदार प्रमोद चौधरी, अविनाश चौधरी आणि पो कॉ सुमित बाविस्कर यांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले व त्याच्या जावड चा मुद्देमाल जप्त केला,व पो कॉ सुमित बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोळीचे ठाण्यात संशयित दीपक माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.