जळगाव, प्रतिनिधी । श्रींची विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नये. विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग व महापालिका, पोलिस प्रशासन यांच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.