मुक्ताईनगर ः प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा श्रीसंत मुक्ताबाई, योगराज चांगदेव महाराज माघवारी महाशिवरात्री यात्रोत्सव रद्द करण्यात येत असल्याचे तहसीलदार यांनी आयोजीत केलेल्या यात्रा पुर्व आढावा बैठकीत सांगीतले.
दरवर्षीप्रमाणे आदिशक्ती मुक्ताबाई व योगराज चांगदेव महाराज या गुरू-शिष्य भेटीनिमित्त माघ कृष्ण दशमी ते महाशिवरात्रीपर्यंत भव्यदिव्य यात्रोत्सव साजरा होतो. राज्यभरातील शेकडो दिंड्यांसह लाखावर वारकरी भाविक या वारीत सहभागी होतात. गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटामुळे अनेक उत्सव साजरे करताना शासनाने निर्बंध घातले आहे. यावर्षी दि.८ ते १२ मार्च पर्यंत येत आहे. नेमका याच कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढत असल्याने लाकडाऊन नव्याने करण्याचे संकेत आहे. विशेषतः विदर्भातील भाविक जास्त प्रमाणात वारीत सहभागी होतात व तिकडे कोरानाचे संकट वाढले असल्याने खबरदारी म्हणून यंदाचा चांगदेव-मुक्ताबाई यात्रोत्सव रद्द करून प्रातिनिधिक स्वरूपात साजरा करण्याची सुचना संत मुक्ताबाई, चांगदेव संस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक, विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांच्या तहसील दालनात बोलावलेल्या यात्रोत्सव पूर्व आढावा बैठकीत नायब तहसीलदार प्रदिप झांबरे यांनी दिली.
विदर्भ मराठवाडा या भागातून भाविक भक्त मुक्ताई नगरीत संत मुक्ताबाई च्या व चांगदेव महाराजांच्या यात्रा उत्सवाला जास्त प्रमाणात येत असून सुमारे मुक्ताईनगर महाशिवरात्रि वारीमध्ये अंदाजे २०० दिंड्या येत असून एका दिंडीमध्ये पाचशे वारकरी असतात दिंड्यां मध्ये येणारे वारकरी लाखोंच्या घरामध्ये येत असून आणखी जवळपासचे वारकरी हे येत असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी १५ जानेवारीला तात्काळ लोक डॉन चा निर्णय घेऊ असे सुद्धा सांगितले असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा या लॉक डाऊन ला सहमती दिलेली आहे परंतु पूर्ण राज्यात तरी लॉक डाऊन ची शक्यता नाही असे सुद्धा त्यांनी सांगितले असताना अकोला जिल्ह्यातील बरेचसे ठिकाणे लॉकडाऊन करण्यात आले आहे त्याच पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई ची वारी महाशिवरात्री हे राज्यस्तरीय असून बंद करण्यात आलेली आहे यावर हजारो व्यवसायिक यांचे घरे अवलंबून आहे त्यांना उपासमारीची वेळ येणार मागील वर्षी सुद्धा कोरोनामुळे सर्वच लोकांचे व्यवसाय बुडाले परंतु आता कुठेतरी नवीन उमेद घेऊन व्यवसायिक व्यवसाय करण्यासाठी लागले असता पुन्हा कोरोनाचे सावट त्यांना व्यवसाय न करण्यास भाग पाडत आहे.