म.सा.प.कार्यकारिणीच्या सदस्य पदी विजय लुल्हे

0
72

जळगाव : प्रतिनीधी
तालुक्यातील तरसोद येथिल जि.प.शाळेचे उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे यांची महाराष्ट्र साहित्य परिषद जळगाव शाखेच्या कार्यकारीणीच्या सदस्यपदी पंचवार्षिक सन २०२१ ते २०२६ कालावधीसाठी निवड झाली आहे. सदरहू निवड मसाप जळगाव शाखेचे अध्यक्ष प्रा.ए.पी.चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शाखेच्या
दि.२६ एप्रिल २०२१ रोजी आभासी पद्धतीने झालेल्या सर्व साधारण सभेत लुल्हेंची सर्वानुमते निवड घोषित करण्यात आली.लुल्हे पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आजीव सभासद आहेत. लुल्हे यांच्या कविता वाड़मयीन नियतकालीकात प्रकाशित होत असतात.त्यांच्या कविता,प्रासंगिक शैक्षणिक लेख,समिक्षण,विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती दर्जेदार वृत्तपत्रातून व दिवाळी अंकातून प्रकाशित होत असतात.कै.कविवर्य नीळकंठ महाजन स्मृती प्रतिष्ठानचे लुल्हे संस्थापक माजी अध्यक्ष आहेत.त्यांनी नवोदित कवींना संस्थेतर्फे राज्यस्तरीय ५००० रुपयांचे पुरस्कार स्मृतिचिन्ह देऊन ५ वर्षे दिग्गज साहित्यिकांतर्फे सन्मानित केले.बृहन महाराष्ट्रस्तरावर काव्य स्पर्धा घेतल्या.अ.भा.साने गुरुजी कथामाला (मुंबई ),पक्षीमित्र संघटना (चिपळूण),मराठी विज्ञान परिषद जळगाव,पर्यावरण शाळा जळगाव संस्थांचे ते आजीव सभासद आहेत.
कोविड महामारी काळात जिल्हा परिषदेच्या नवोदित साहित्यिक शिक्षकांसाठी जिल्हा स्तरावर प्रथमच महात्मा फुले जयंतीच्या औचित्याने ‘‘ महात्मा ज्योतिबा फुले साहित्य मंडळ ‘‘ १० एप्रिल २०२० रोजी स्थापन करून व्यासपीठ निर्माण केले.त्या अंतर्गत काव्य स्पर्धा आयोजन,खुले कविसंमेलनांचे आयोजन करून संघटना बांधणी केली.आजतागायत हा जिल्ह्यातील पहिलाच अभिनव प्रयोग ठरल्याने त्याला उदंड प्रतिसाद मिळाला.प्राथमिक शिक्षकांची वाचनाभिरुची दर्जेदार होऊन ते सातत्याने लिहिते व्हावे,संघटित होऊन साहित्यिक उपक्रम राबवावेत आणि त्यांच्या अंगभूत सुप्त गुणांच्या अभिव्यक्ती साठी हक्काचे व्यासपीठ मिळावे या उदिष्टाने भारतरत्न डॉ.ए.पी. जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीची वाचन प्रेरणा दिनी लुल्हे यांनी कवी लेखक शशिकांत हिंगोणेकर यांच्या मार्गदर्शनानुसार व डायट माजी प्राचार्य नीळकंठ गायकवाड यांच्या प्रेरणेने दिनांक १५ ऑक्टोबर २०२० रोजी स्थापना करून त्या अंतर्गत विविध साहित्यिक उपक्रम कालोचित राबविताहेत .
यावल तालुक्यात किनगाव बु ॥ येथे ग्रामीण भागात त्यांनी पूज्य साने गुरुजी मोफत वाचनालय व ग्रंथालयाची स्थापना केली असून वाचनालयास शासन मान्यता मिळून ‘‘ ड ‘‘श्रेणी प्राप्त झाली आहे.कार्याध्यक्ष व माहिती अधिकारी म्हणून लुल्हे जबाबदारी सांभाळत आहेत.त्यांनी यावल तालुक्यातील ग्रामीण भागात वाचनाची गोडी लावण्यासाठी अवघ्या ५० रुपयात ५० विविध दर्जेदार दिवाळी अंक विना डिपॉझिट वाचकांना उपलब्ध करून देऊन तब्बल ५ वर्षे एकट्याने व्रतस्थपणे वाचन संस्कृती चळवळीला गतीमान केले.अजब डिस्ट्रीब्युटर कोल्हापुर प्रकाशित कोणतेही पुस्तक ५० रुपये या योजनेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांची १२०० चरित्र पुस्तके घरोघरी वैयक्तिक संपर्क करून चालता बोलता,तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमापूर्वी उपस्थित रसिकांशी सुसंवाद करून ‘‘ ना नफा ना तोटा ‘‘ पद्धतीने विकली. वल्लभदास वालजी वाचनालय जळगाव यांना जागतिक पुस्तक दिनानिमित्त ४००० रुपयांची पुस्तके साहित्यिकातर्फे ग्रंथदान अंतर्गत प्राप्त करून दिली.अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे १००० वर्गणीदार नोंदवून.कै.पद्मश्री शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्या हस्ते ‘‘ शतकवीर ‘‘ पुरस्कार सन्मानपूर्वक पटकावला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते जिल्हा विविध उपक्रम प्रमुख असतांना त्यांनी जिल्ह्यात प्रामुख्याने यावल तालुक्यात अनेक समाज प्रबोधनपर कार्यकम राबविले.डायबेटीस, हृदयविकार व अन्य आजारांवरील मासिकांचा प्रचार प्रसार करून विना कमिशन वर्गणीदार नोंदविले.सहकारी संस्थांच्या वतीने वृत्तपत्र वाचनालये सुरू केली.दुर्गम भागात वृतपत्रे सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देत सर्वतोपरी सहकार्य केले.थोर समाजसेवक अण्णा हजारे पुरस्कृत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र जळगाव जिल्हा सहसचिव म्हणून लुल्हेंनी सार्वजनिक ठिकाणी माजी कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांच्यासह मान्यवर समाज सेवकांच्या हस्ते शेकडो वृक्षारोपण केले. कार्यसिमेची चौकट विशाल व समाजाभिमुख करीत जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले यांच्या सहकार्याने जळगावला रक्तदान शिबिरे घेतली . जळगावच्या सहा प्रभागातील वार्डात लोकसहभागाने मोफत वृत्तपत्रे वाचनालये सुरु केली.यावल तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांना लोकसहभागातून १५००० रुपयांची प्रत्येक शाळेला एकूण ५ पुस्तकांचा सेट प्रमाणे १००० चरित्र पुस्तकांचे वाचन प्रेरणा दिना निमित्ताने मोफत वितरण केले.ग्रामीण भागात चोपडा,यावल तालुक्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी सुविचार लोकवस्ती व समाज मंदिरावर तसेच माळी वाड्यांमध्ये महात्मा फुले यांचे प्रबोधनपर अखंड स्वत : भित्तीपत्र पेंटींग करून स्वखर्चाने प्रबोधन अभियान राबविले.मरणोत्तर नेत्रदान व देहदान याबाबतही त्यांनी प्रबोधन करून अभियानांतर्गत शेकडो संकल्पपत्रे भरून घेतली.या दर्जेदार साहित्यिक सर्वस्पर्शी उपक्रम,वाचन संस्कृती चळवळ,अंधश्रद्धा निर्मूलन,वृक्षारोपण संघटनात्मक बांधणी व अन्य सामाजिक उपक्रमांची दखल घेऊन लुल्हे यांची बिनविरोध स्तुत्य निवड झाली.त्यांच्या व्यापक समाजकार्याचा गौरव या निवडीमुळे सर्वार्थाने झाला.
लुल्हे यांची मसाप जळगाव कार्यकारीणीत निवड झाल्याने प्राचार्य डॉ.शिरीष पाटील, डॉ.अशोक कौतिक कोळी, प्रभात चौधरी, डॉ.सत्यजित साळवे, कवी नामदेव कोळी, डॉ.योगेश महाले, प्रा.गोपीचंद धनगर, युवराज माळी, शशिकांत हिंगोणेकर, संपादक मोरेश्‍वर सोनार, कवयित्री माया धुप्पड, डॉ.संजीवकुमार सोनवणे, प्राचार्य डॉ.वासुदेव वले, डॉ.सुनिल मायी, डॉ.रविंद्र बावणे, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिंदे,डायट जळगाव माजी प्राचार्य नीळकंठ गायकवाड,निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर,अंनिसचे राज्य कार्यवाह मानसोपचार विभाग डॉक्टर प्रदिप जोशी,दिगंबर कट्यारे सर,मुक्त पत्रकार विश्‍वजीत चौधरी, मराठी विज्ञान परिषदेचे सर्वेसर्वा भालचंद्र पाटील, दिलीप भारंबे,सुनिल पवार,शिरीष चौधरी,लेखक चंद्रकांत भंडारी, पत्रकार दीपक महाले,प्राचार्य आर्टिस्ट राजेंद्र महाजन,संजय भावसार, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ जळगाव जिल्हाध्यक्ष नाना पाटील, विस्तार अधिकारी प्रतिमा सानप, असोदा केंद्रप्रमुख भगवान वाघे,स्वाध्यायी मनोहर बाविस्कर,ग्रेडेड मुख्याध्यापक बाळकृष्ण ठोसरे,कलाशिक्षक सुनिल दाभाडे, अरुणाताई उदावंत, सारीका पाटील,लेखक संजीव शेटे,कवयित्री जयश्री काळवीट, कवयित्री जबीन शेख, पं.स.यावल सदस्य मिनाताई तडवी,दिपक चव्हाण, कवी अँड.गोविंद बारी,असिफ तडवी, ज्योती राणे, छाया पवार पाटील,पी.टी.पाटील,युवराज सुरळकर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here