‘म्युकरमायकोसिस’ बरे झालेल्या रुग्णाने घेतली अधिष्ठात्यांसह वैद्यकीय पदकाची सदिच्छा भेट 

0
18

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना महामारीच्या काळात म्युकरमायकोसिस आजाराने देखील ‘एन्ट्री’ मारली होती. एका रुग्णाला म्युकरमायकोसिस झाल्यानंतर अत्यंत कठीण परिस्थिती मधून बाहेर पडून व सहा महिन्यानंतर आज पूर्णपणे बरा झाला. कृतज्ञता म्हणून रुग्णाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची बुधवार दि. ५ जानेवारी रोजी सदिच्छा भेट घेतली. यावेळी “रूग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे अविरत सहकार्य लाभले, म्हणून आज मी बरा झालो व माझ्या कुटुंबाला दिलासा मिळाला” अशी भावुक प्रतिक्रिया रुग्णाने व्यक्त केली.

घनश्याम उखा कोळी (वय ६५, रा. तऱ्हाडी ता. अमळनेर) असे या रुग्णाचे नाव आहे. जून महिन्यात त्यांना म्युकरमायकोसिस आजाराची लागण झाली. आजाराचे निदान झाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांच्या जबड्यावर कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ.अक्षय सरोदे, दंतशल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. इम्रान पठाण, शल्यचिकित्सा विभागातील डॉ. उमेश जाधव, बधिरिकरणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप पटेल यांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली होती.

शस्त्रक्रिया करून म्युकरमायकोसिसची बुरशी काढून टाकण्यात आली होती. त्यानंतर दोन महिने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पुढील तीन महिने घरी केवळ औषधांवर उत्तमरित्या घनशाम कोळी हे बरे झाले.

सहा महिन्याच्या कालावधीनंतर कृतज्ञता म्हणून घनशाम कोळी हे वैद्यकीय पथकाचे आभार मानण्यासाठी बुधवारी दि. ५ जानेवारी रोजी आले होते. यावेळी त्यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेतली. आपण २५ ते ३० लाख रुपयांची उपचार पद्धती सरकारी खर्चामध्ये विनामूल्य करून दिली. आज माझे प्राण वाचले. माझ्या कुटुंबाला दिलासा मिळाला, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ.अक्षय सरोदे, दंतशल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. इम्रान पठाण, शल्यचिकित्सा विभागातील डॉ. उमेश जाधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here