जळगाव, प्रतिनिधी । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने रावेर शहरातून आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किमत असलेले ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. दुसऱ्या राज्यातून दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून अटक करण्यात आली आहे.
संशयीताकडे प्रतिबंधीत ड्रग्ज ब्राऊन शुगर असल्याची दाट शक्यता आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा अर्थात एलसीबीने रावेर तालुक्यात मोठी कारवाई करून अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्याची कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.
एलसीबीच्या पथकाला रावेर तालुक्यात अंमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. या संदर्भात गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आले असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईला एलसीबीच्या सूत्रांनी दुजोरा दिला असला तरी या संदर्भात सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार एलसीबीच्या पथकाने ब्राऊन शुगरचा मोठा साठा जप्त केला असून याचे मूल्य करोडो रूपयांचे असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात सायंकाळी आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.