जळगाव ः प्रतिनिधी
केंद्र सरकार गॅस सिलेंेडरच्या आणि इंधन दरात सातत्याने वाढ करत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तब्बल ३ वेळा गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली. ही वाढ अनुक्रमे २५, ५०, २५ इतकी वाढवली गेली. मार्च महिन्यात पहिल्याच दिवशी २५ रुपये वाढ केली.गॅस सिलेंडरचा आजचा भाव ८२७ रुपये असुन स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिन्यात इतकी वाढ केली. यामुळे सर्वसामान्य जनता, गृहिणी त्रस्त झाले आहेत त्यांचे जगणे असह्य झाले असुन बजेट बिघड़ले आहे. तरीही नरेंद्र मोदी महागाईच्या मुद्यांवर ना बघत आहेत, ना बोलत आहेत ,ना ऐकत आहेत. जनतेच्या अपेक्षा पूर्ण न करणारे मोदी सरकार असून, इंधन दरवाढ, महागाई यामुळे मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ काल रिलायन्स पेट्रोल पंपावर … मैं ना देखुंगा, मैं ना बोलुंगा, मैं ना सुनुंगा… आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस मुक्तदिर बाबा देशमुख व शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मुजीब पटेल यांंच्या नेतृत्वखाली रईस कुरेशी, नाझिम शेख, बापू मोरे ,विनोद पाटील व युवक कांँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते