मेडीकलवर जाणाऱ्या चार तरूणांनी किरकोळ कारणावरून एकाला बेदम मारहाण

0
16

जळगाव प्रतिनिधी । दवाखान्याच्या निमित्ताने जात असलेल्या एका तरूणाला मेडीकलवर जाणाऱ्या चार तरूणांनी किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पायधन हॉस्पीटल समोर कंजरवाडा येथे राहणारा गोकुळे बबन लोंढे (वय-३०) हा वडीलांसह ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता पंचमुखी हनुमान मंदीराजवळील शोभा हॉस्पिटलशेजारी असलेले मेडीकलवर मास्क घेण्यासाठी गेले. मेडीकलवरील चार अनोळखी तरूणांनी चिडवले. याचा जाब विचारण्यासाठी गेला असता चौघांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी अनोळखी चार जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुनिल सोनार करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here