नाशिक: भारतातील अग्रगण्य निदान सेवा प्रदाता मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लि.ने त्यांचे नवीन चाचणी केंद्र महाराष्ट्रातील नाशिक मध्ये सुरू केले आहे. 750 स्क्वेअर फूट इतक्या जागेवर असलेल्या या प्रयोगशाळेत दरमहा सुमारे 30,000 नमुने चाचणी करण्याची क्षमता आहे. या मुळे उच्च-गुणवत्तेचे अहवाल किमान वेळेत प्राप्त करणे शक्य होणार आहे. केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.आवेश पल्लोड लाभले.
मेट्रोपॉलिस लॅबोरेटरी, नाशिक, मध्ये मूलभूत पॅथॉलॉजी चाचण्यांपासून ते मॉलिक्यूलर डायग्नोस्टिक या हाय-एंड निदान चाचण्यांपर्यंत सुमारे 80+ वेगवेगळ्या चाचण्या केल्या जाऊ शकतात. मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लिमिटेडची प्रयोगशाळा औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर आणि इतर ठिकाणी आहेत.
मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लि.च्या नाशिकमधील डॉ. पटेल मेट्रोपॉलिस लॅबचे प्रमुख डॉ.मनोज पटेल म्हणाले, “नाशिकरोड येथे आमची नवीन प्रोसेसिंग लॅब सुरू करण्याची घोषणा करताना आम्हाला अभिमान वाटतो. मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लिमिटेड गेल्या एक दशकाहून अधिक काळ नाशिकच्या लोकांना सेवा देत आहे. कोविड -१९ च्या सुरुवातीच्या काळात आम्ही ५०,००० हून अधिक रुग्णांना सेवा दिली. आम्ही खात्री देतो की सर्वोत्तम सेवांसह अहवालांची गुणवत्ता सातत्याने प्रदान करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असेल. ”
मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विजेंदर सिंह यांनी या केंद्राच्या उद्घाटनाबद्दल सांगितले की “आमच्या विद्यमान प्रयोगशाळांव्यतिरिक्त, आम्ही आमच्या नवीन चाचणी प्रयोगशाळेची महाराष्ट्रातील नाशिक येथे सुरूवात केल्याबद्दल आनंदित आहोत. साथीच्या रोगाची सावली कायम असताना, आमचे ध्येय हे आहे की भारतभरातील अधिक शहरांमध्ये केंद्रांचा विस्तार व्हावा आणि आमची सेवा नेहमी प्रत्येकासाठी रिअल टाइम आधारावर उपलब्ध राहावी. प्रयोगशाळेत काम करणारी चमू सर्वोत्कृष्ट गुणवत्ता कायम राखण्यासाठी दिवस-रात्र काम करते.
” मेट्रोपॉलिस प्रयोगशाळा व्यापक चाचण्या आणि उच्च दर्जाचे अहवाल परवडणाऱ्या दरात देतात. हे भारतात आणि परदेशात त्याच्या असंख्य गुणवत्ता मान्यतांसाठी ओळखले जाते आणि अनेक दशकांचा अनुभव असलेल्या
मेट्रोपॉलिस ने चाचण्यांसाठी भारतीय संदर्भ श्रेणी विकसित केली आहे, जी आता हजारो प्रयोगशाळांद्वारे वापरली जात आहे.
नवीन प्रयोगशाळा दुकान क्रमांक 4 आणि 5, तळमजला, दुर्गा अपार्टमेंट, आर्टिलरी सेंटर रोड, दुर्गा उद्यानाजवळ, नाशिक रोड, नाशिक – 422101 येथे आहे.