मेटॅफर आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनासाठी स्टीपलींग मास्टर आर्टिस्ट अनिलराज पाटील यांच्या चित्रांची निवड

0
79
चोपडा प्रतिनिधी  येथील प्रख्यात कलाकार अनिलराज
पाटील यांच्या अद्भुत कलाकृतीची ” इंद्रधनु
कलाजगत ” दिल्ली (RAINBOW ART WORLD , DELHI ) द्वारा आयोजित metaphor INTERNATIONAL ONLINE ART Exhibition Competition साठी निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेत जगभरातील नामवंत कलाकारांच्या चित्राची निवड झालेली आहे. त्यात चोपडा नगरीतील युवा
कलावंताच्या कार्याची निवड होणे ही चोपडा नगरीसाठी अभिमानाची बाब आहे.
विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यात सलग तिसऱ्यांदा त्यांच्या विविध कलाविष्काराची निवड राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनासाठी झाली. त्यात हार्मनी इंटरनॅशनल आर्ट एक्झिबिशन , ऑल इंडिया लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर स्मृति चित्रप्रदर्शन या जगविख्यात संस्थांच्या प्लॅटफॉर्मवर याअगोदर निवड झालेली आहे.याव्यतिरिक्त कोविड-19 या कालावधीत अनेक विभागीय व राज्य पातळीवरील स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसे मिळवली आहेत. तसेच चोपडा तालुका व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मंदिरांचे रंगकाम , मंदिरांच्या मूर्तींची सजावट, शाळेतील डिजिटल डिझाईनिंग, गृह भिंतींचे अनोखे निसर्ग चित्रकाम व अबस्त्रॕक्ट डिझाईन तसेच स्वच्छता अभियान व माझी वसुंधरा अभियान यासंबंधी प्रबोधनात्मक चित्रकाम शहरातील भिंतींवर बघावयास मिळते.
या उत्तुंग यशासाठी त्यांची सातत्यपूर्ण कलाराधना बरोबरच पुण्याचे ज्येष्ठ चित्रकार चंद्रशेखर कुमावत यांचे मार्गदर्शन व चोपडा येथील ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र महाजन व सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे ठरले आहे.
असे त्यांनी सांगितले. विजेत्या चित्रकारांना जगविख्यात लीजेंडरी आर्टिस्ट “मायकेल एंजेलो अवॉर्ड –  2022” या सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. या ऑनलाईन चित्र प्रदर्शनाचा कलाप्रेमींना भारतातील सर्व सोशल मीडिया हँडल्सवर 15 मार्च 2022 नंतर लाभ घेता येईल असे रेनबो आर्टवॉल द्वारा जाहीर करण्यात आले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून तसेच ललित कला महाविद्यालय, चोपडा व जिल्ह्यातील सर्व चित्रकारांकडून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here