जळगाव ः प्रतिनिधी
कोरोनाचा कहर कमी झाला असून कोरोना काळात गरजू आणि गरीबांना बरेच संस्थांनकडून विविध प्रकारची मद्त करण्यात आली होती, आता गेल्या पंधरा दिवसापूर्वी अवकाळी पावसामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुस्लिम सुटडेन्ट ऑर्गनाइज़ेशन ऑफ इंडिया ही सूफी संत विचारधाराची संस्थेतर्फे पूर्ण भारतात अमीन ए मिल्लत यांच्या आदेशानुसार गरजुंना कंबळ वाटप करण्यात येत आहे .
जळगावातही फुटपाथ, मन्दिर, दरगाह, रेलवे स्टेशन, बस स्टैंड, मार्केट कॉम्प्लेक्स परिसरात राहणार्या गोर – गरीब, भिक मागणार्या गरजुंना उबदार कंबळ वाटप करण्यात आले.
कंबळ वाटपच्या आधी मेहरूण येथे दहा ते बार लोकांची उपस्थितीत कंबळ वाटपचे नियोजन करण्यात आले . या कार्यक्रमात सर्वप्रथम मुफ़्ती गुलाम हसनैन यांनी पवित्र कुरआन पठन करून सुरुवात केली . प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अक़ील खान सर, इंटरनैशनल कौंसिल ऑफ ह्यूमनराइटचे ज़िलाध्यक्ष व पत्रकार शाह एजाज़ होते कार्यक्रमात साजिद खान साहब, मोईन काज़ी, हफ़ीज़ इंजीनियर, कैफ़ नागोरी, अकरम शाह , असरार शेख, अब्दुलरक़ीब यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. रफ़ीक़ काज़ी यांनी मुस्लिम स्टूडेंट ऑर्गनाइज़ेशन ऑफ इंडिया बद्दल माहिती देत सांगितले की, ही संस्था १९७७ मधे अमीन ए मिल्लत यांच्या अध्यक्षेत स्थापना झाली पूर्ण भारतात ही संस्था सूफी संत विचारधारा असणारी असून विविध प्रकारची सेवाभावी कामे करत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इसहाक शेख यांनी केले .तर आभार प्रोफेसर अयाज़ शाह यांनी मानले.