मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याबाबत निवेदन

0
28

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतात पाणी साचले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाव्दारे केली आहे.

यावेळी हरताळा सरपंच दिपक कोळी, उपसरपंच नामदेवराव भड, बोदवड उपनगराध्यक्ष दिनेश माळी, गटनेते कैलास चौधरी, नगरसेवक दिपक झांबड, गोपाळ गंगतिरे, रवींद्र खेवलकर, प्रदिप बडगुजर, भरत पाटील, मुकेश क-हाळे, भगतसिंग पाटील, शंकर चिखलकर, हमीदपठाण, महेश शेळके उपस्थित होते. जळगाव जिल्हयात गेल्या महिन्या भरापासून मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे पिके पिवळी पडली असून त्यांची मुळे सडत आहेत. उडीद मुग ,सोयाबीनला कोंब फुटले आहेत तर कपाशीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या हाताशी आलेले पिक वाया गेले आहेत. यात शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी यांनी महसुल यंत्रणेला या नुकसानीचे सर्व्हे करण्याचे आदेश द्यावे व शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकरी बांधवाना मदत मिळवून द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र पाटील आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here