जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात मुलाकडून बापाला लाकडी फावड्याने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलिस स्थानकात आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
तालुक्यातील नांद्रा येथील रहिवाशी जानकीराम दगडू सोनवणे (वय – ६५) हे मुलगा हिरामण सोनवणे यांच्यासह राहतात. गेल्या अनेक दिवसांपासून मुलगा हिरामण सोनवणे हा काही एक कामधंदा करीत नसल्याने वडील जानकीराम सोनवणे हे चिंतेत होते. याबाबत रविवार, २ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जानकीराम सोनवणे यांनी मुलगा हिरामण याला कामधंदा का करत नाही ? असा जाब विचारला याचा राग हिरामणला आल्याने त्याने घरात असलेल्या लाकडी फावड्याने वडील जानकीराम यांना मारहाण बेदम मारहाण केली.
यात त्याचा हाताचा पंजा मोडून गंभीर जखमी केले. या प्रकरणी जानकीराम सोनवणे यांच्या फिर्यादीवरून मुलगा हिरामण जानकीराम सोनवणे याच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेड कॉन्स्टेबल साहेबराव पाटील करीत आहे.