रावेर प्रतिनिधी
सध्या सर्वत्र कोरोनामुळे लाकडाऊन आहे सोशल डिस्टनसिंगचा पालन करून लग्नाची धामधूम सुरू आहे. आजच्या काळात लग्नसमारंभ मोठ्या थाटात करण्याची पद्धत रूढ झाली आहे. समाजात तर लग्नसमारंभावर लाखो रुपये खर्च केले जातात. पण रावेर शहरातील सरफराज खान रफीक खान आणि जळगाव येथील अतिक शेख परिवारातील सदस्य तथा शिक्षित दाम्पत्याने बडेजावपणा व अनावश्यक खर्चाला फाटा देत चट मंगनी पट ब्याह’ करून मुस्लिम समाजासमोर एक आदर्श निर्माण केले आहे.
रावेर शहरातील मदिना कॉलनी येथील रहिवासी अँग्लो उर्दू शाळेचे शिक्षक व जमाआत ए इस्लामी हिंदचे सदस्य सरफराज खान रफीक खान यांचे सुपुत्र मुजम्मील खान हे बीएस्सी बीएड शिक्षित आहे. त्यांच्यासाठी मुलगी पाहायला जळगाव येथील सालार नगर येथे शेख परिवारात एक जानेवार रोजी जळगावात मुलगी पहावयास आले होते. अतिक शेख (जळगाव) यांची मुलगी असमा बी शेख हीने सुद्धा बीएससी पर्यंत शिक्षण केले आहे.
दोघांनीही एकमेकांना पसंत केले. दोन्ही परिवाराचीही पसंती झाली आणि त्यातूनच अवाजवी खर्च आणि वेळ वाया घालविण्यापेक्षा लागलीच लग्न लावून देण्यास काय हरकत आहे? असा प्रस्ताव समोर आला.दोन्ही परिवारांनी त्याला होकार दिला आणि अवघ्या दोन तासांतच कौटुंबिक वातावरणात मोजक्या समाजबांधवांच्या व आप्तेष्टांच्या उपस्थितीत इस्लाम धर्म पद्धतीने मुजम्मील खान आणि असमा शेख यांचा निकहा मुफ्ती अतिकुर रहेमान यांनी लावला यावेळी आमीर सोहेल व मण्यार बिरादरीचे फारूक शेख उपस्थित होते दुल्हा दुल्हन (वधू-वरास) आशीर्वाद देत मुस्लिम समाजातील दोन्ही परिवारांनी वेळ, श्रम व पैशांची बचत करून समस्त मुस्लिम समाजात एक नवीन आदर्श निर्माण केला असल्याचे फारूक शेख यानी सांगितले व समाजाला आता अशा प्रकारच्या विवाहांची गरज असून, खान व शेख परिवाराचे अभिनंदन व कौतुक होत आहे .
या आदर्श विवाहासाठी हाजी रफिक खान रहेमान खान , सरफराज खान, समसेर खान, मनियार बिरादरी अध्यक्ष फारूख शेख, अतिक शेख , जरार खान , हाजी रियाज अहमद, शेख सईद, , अय्यूब खान, खान व शेख परिवार उपस्थित होते.
अवाजवी खर्च आणि वेळ वाया घालविण्यापेक्षा लागलीच लग्न लावून देण्यास काय हरकत आहे? असा प्रस्ताव समोर आला. दोन्ही परिवारांनी त्याला होकार दिला आणि अवघ्या दोन तासांतच नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी जळगावात कौटुंबिक वातावरणात मोजक्या समाजबांधवांच्या व आप्तेष्टांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजातील इस्लाम धर्म पद्धतीने मुजम्मील खान सरफराज खान रावेर आणि असमा बी अतिक शेख जळगाव यांचा निकाह (विवाहबद्ध) लावण्यात आला.