मुर्दापूर धरणातून सोडले आवर्तन; पिकांना मिळणार जीवनदान

0
25

नशिराबाद, ता.जळगाव ः प्रतिनिधी
येथील मुर्दापूर धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यासाठी जि.प. उपाध्यक्ष यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे काही दिवसांपूर्वी मागणी केली होती. त्यानुसार मुर्दापूर धरणाला आवर्तन सोडण्यात आले. या आवर्तनामुळे जवळपास ८०० ते ९०० एकर शेतीच्या पिकांना फायदा होणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.
नशिराबाद परिसरातील मुर्दापूर धरणक्षेत्रात यावर्षी पुरेसा पाऊस झाल्यामुळे १०० टक्के भरलेले आहे. धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात रब्बी ज्वारी व हरभर्‍याची पेरणी केलेली आहे. परिसरातील शेतकर्‍यांकडून रब्बीच्या पिकांना पाण्याची आवश्यकता असल्यामुळे शेतकर्‍यांनी जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्याकडे पाण्याचे आवर्तन सोडण्या संदर्भात मागणी केली होती. त्या अनुशंगाने या पत्राचा सहानुभूती पुर्वक विचार करुन मुर्दापूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत नियोजन करावे, अशी मागणी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग जळगाव यांच्याकडे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी केली होती.
या पाठपुराव्या नुसार आज सकाळच्या सुमारास मुर्दापुर धरणाचे आवर्तन सोडण्यात आलेे. या आवर्तनामुळे परिसरातील ८०० ते ९०० एकर शेतीला मोठा फायदा या पाण्यामुळे होणार आहे. यामुळे शेतकर्‍यांमध्ये एक आनंदाचे वातावरण देखील पहावयास मिळाल्याने अजून काही शेतकर्‍यांनी जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील यांचे आभार देखील मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here