मुराद पटेल यांचा शिवसेनेत प्रवेश

0
40

चाळीसगाव ः प्रतिनिधी
तालुक्यातील धडाडीचे पत्रकार तथा खडकी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मुराद पटेल यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचा भगवा त्यांच्या गळ्यात घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. हा प्रवेश सोहळा जळगाव येथील शिवसेना कार्यालयात पार पडला.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, आ.चिमणराव पाटील, आ. किशोर पाटील, आ.लताताई सोनवणे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, तालुका संपर्कप्रमुख प्रकाश वाणी, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, भीमराव खलाने, सुनील गायकवाड उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here