जामनेर : प्रतिनिधी
शेरी ग्रामपंचायतकडे मोफत पाणीसाठा असतांना विहीर अधिग्रहित करून शासनावार गरज नसतांना आर्थिक बोजा टाकून या विहिरी मधून पाणी उपसण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, पाझर तलावामध्ये आणी त्यातील विहीरींना मुबलक पाणी असतानां शेरी गावातील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाई भासविण्याचा प्रकार शेरी ग्रामपंचायत प्रशासनाकडून सुरु असल्याचे चित्र आहे.
मौजे शेरी तालुका जामनेर येथील १५०० लोकसंख्येचे गाव आहे. या गावात मागील १५ वर्षापासून शासनामार्फत साठवण तलाव बांधण्यात आला आहे त्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसात किमान २ वर्ष पुरेल एवढे पाणी साचत असते आणि शेरी ग्रामपंचायतने काही वर्षापूर्वी स्वखर्चाने साठवण तलावासाठी ज्या जमीनी अधिग्रहीत केल्या आहे.
त्यामध्ये किमान ६० फूट खोल विहीरीचा उन्हाळ्यात पाझर तलावातील ग्रांमपचायतच्या मालकीचा विहीर राणीसाठी कमी झाल्यास विहीर ऊघडी पडल्यावर नागरिकांना पिण्यासाठी पाणी कमी पडल्यास तीचा सुध्या वापर होतो म्हणून सदर विहीर करण्यात आली होती.परंतु आज परिस्थिती अशी आहे कि या पाझर तलावामधे २० ते ३० % पाणी साठा शिल्लक आहे,या पाझर तलावासाठी शेतकर्यांच्या जमिनी गेल्यानंतर या जमीनीमधील विहिरींना मुबलक पाणी आहे.विशेष म्हणजे या ३ ते ४ विहीरी आता शासन मालकीच्या आहेत.
सध्या शेरी गावाला पुढे अजून २ महिने पुरेल एवढे पाणी आहे आणि हे मोफत पाणी वापरायला असतानां देखील शेरी ग्रामपंचायतने पाझर तलावा शेजारी खाजगी जमीन मालक बाबुराव विठ्ठल पाटील यांचे शेतातील विहीर शेरी ग्रामपंचायत मधील सदस्यांनी या शेतकर्याला न विचारता त्याच्या विहिरीचा विहीर अधिग्रहणचा चुकीच्या पद्धतीने ठराव करून सदर शेतमालकाची विहीर गावातील नागरीकांना पाणी पुरविण्यासाठी अधिग्रहित केली आहे.
गावातील नागरिकांनी मग शेरी ग्रामपंचायत पाणी पुरवत नसेल तर गावा मध्ये पाणी टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली गावकर्यांनी केली आहे आणी शेरी ग्रामपंचायतच्या पाणी नियोजना बाबत जामनेर तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना पुढील काळात नागरिकामार्फत पाणी टंचाई बाबत मोर्चा नेऊन निवेदन देण्यात येणार आहे.