मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्सची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत प्रामुख्याने राज्यात पूर्ण लॉकडाउन लागू करावा का, तो ८ दिवसांचा असावा की १४ दिवसांचा असावा, याबाबत चर्चा केली जात आहे.
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्सची बैठक (task force meeting) सुरू झाली आहे. या बैठकीत प्रामुख्याने राज्यात पूर्ण लॉकडाउन लागू करावा का, तो ८ दिवसांचा असावा की १४ दिवसांचा असावा, याबाबत विचारविनिमय केला जात आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात ८ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला राज्यातील प्रसिद्ध डॉक्टर्स उपस्थित असून काही इतर तज्ज्ञही सहभागी असल्याचे समजते.
राज्यात १४ दिवसांचा लॉकडाऊन हवा की ८ दिवसांचा?
राज्यात करोनाची एकूण स्थिती पाहता कडक लॉकडाउन लागू करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होऊ लागले आहे. राज्यातील स्थितीची आढावा घेत राज्यात किती दिवसांचा लॉकडाउन लावणे गरजेचे आहे याबाबत टास्क फोर्सच्या बैठकीत विचार केला जाणार आहे. राज्याक फोफावत जाणाऱ्या करोनाला अटकाव करण्यासाठी काय करता येईल यावर या बैठकीत चर्चा करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे राज्यात १४ दिवसांचा लॉकडाउन लागू करावा की ८ दिवसांचा यावर देखील विचारविनियम सुरू असल्याचे समजते.