मुक्या – बहिऱ्या सरकारकडुन शेतकऱ्यांची थट्टा : माजी मंत्री आ.गिरीश महाजन 

0
16
जामनेर(प्रतिनीधी) पंढरीनाथ पाटील:- राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासुन तमाम शेतकरी वर्गाच्या समस्या वाढल्या आहेत,पाणी आहे तर विज नाही,विज असली तर,ट्राँन्सफार्मर नाही अशा विचीत्र परीस्थितीत शेतकरी दुबार अथवा बागायती पिकेही घेऊ शकत नाही, नैसर्गीक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही राज्यातील आघाडी सरकार पुरेशी आर्थीक मदत देण्यात अयशस्वी ठरल्यामुळे या मुक्या-बहीऱ्या सरकारकडुन शेतकरी वर्गाची एकप्रकारे थट्टाच सुरू असल्याची गंभीर टिका माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी केली.
शेतकऱ्यांच्या विवीध समस्यांसाठी तालुका भारतीय जनता पक्षातर्फे गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवार रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.सदर मोर्चाला पाचोरा रोडवरील श्रीमंत बाबाजी राघो मंगल कार्यालयापासून सुरूवात होऊन तहसील कार्यालयाजवळ पोहचल्यावर,मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
यावेळी नगराध्यक्षा साधना महाजन,शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा विजया खलसे,जि.पचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे,तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर,उपनगराध्यक्ष प्रा शरद पाटील,अमर पाटील डॉ प्रशांत भोंडे,अनीस केलेवाले,नाजीम शेख,बाबुराव हिवराळे,उल्हास पाटील, बाबुराव घोंगडे,राजधर पांढरे,रमेश नाईक,विलास पाटील,कमलाकर पाटील,तुकाराम निकम ,निलेश चव्हाण,छगन झाल्टे,महेंद्र बावीस्कर,पं.स.सभापती जलाल तडवी,कैलास नरवाडे, अशोक भोईटे,नामदेव मंगरूळे,नाना वाणी,रिजवान शेख,रतन गायकवाड,बाळु चव्हाण,राजु चौधरी,सुहास पाटील,दिपक तायडे,सदाशीव शिंदे,ज्ञानेश्वर शिंदे,कैलास पालवे,सुभाष पवार ,विजय शिरसाठ,श्रीराम महाजन,दिपक महाराज रिछवाल,सुनिल धनगर,विलास हिवराळे, विजय निमसे,मनोज जंजाळ,अजय नाईक,दिपक पाटील,विनोद पाटील,सोपान पाटील आदी पदाधीकारी – कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी होते.विजेच्या व अन्य समस्या राज्य सरकारने लवकरात – लवकर सोडविल्या नाही तर जिल्ह्यासह राज्यातील प्रत्येक तालुक्यात पक्षातर्फे शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचा ईशाराही यावेळी माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी दिला.सभेनंतर भाजप शिष्टमंडळाद्वारे मागण्यांचे लेखी निवेदन तहसिलदार अरूण शेवाळे यांच्यासह विजवितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड,विकास पाटील आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here