मुक्ताईनगर ः प्रतिनिधी
नगरपंचायत हद्दीतील शासकीय निमशासकीय व नगरपंचायत मालकीच्या जागांवर तसेच खाजगी जागांवर नगरपंचायत प्रशासनाची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून त्यासंदर्भात नगरपंचायतकडे सूचना करूनही कोणत्याच प्रकारची दखल घेतली जात नसल्याबाबत मुक्ताईनगर येथील नगरसेवकांतर्फे जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यासंदर्भात मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीच्या हद्दीतील शासकीय, निमशासकीय तसेच नगरपंचायत मालकीच्या जागांवर मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. त्यासोबतच खाजगी जागांवर सुद्धा बांधकामे सुरू आहेत. परंतु त्यासंदर्भात मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची परवानगी घेण्यात येत नाही. यासंदर्भात मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांच्याकडे उपनगराध्यक्षा मनिषा प्रवीण पाटील यांच्यासह सर्व नगरसेवकांनी सूचनाही केल्या. परंतु त्याकडे नगरपंचायत हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे येथील नगरसेवकांतर्फे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनावर मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा मनिषा प्रविण पाटील, नगरसेवक संतोष कोळी , शबानाबी अब्दुल आरिफ, नुसरतबी मेहबूब खान, बिल्किसबी अमानुल्ला खान, शमीमबी अहमद खान, मुकेशचंद्र वानखेडे, पियुष मोरे, साधना हरिश्चंद्र ससाने, बिलकीसबी असिफ बागवान, शेख शकील खाटीक, शेख मस्तान कुरेशी, कुंदा अनिल पाटील, निलेश शिरसाट आणि ललित महाजन अशा १५ नगरसेवकांच्या स्वाक्षर्या आहेत.
Home जळगाव मुक्ताईनगर मुक्ताईनगरात शासकीय, निमशासकीय, नगरपंचायत व खासगी जागांवर विनापरवानगी अनाधिकृत बांधकाम