Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर»मुक्ताईनगरात गुटखा विक्री सर्रासपणे सुरू
    मुक्ताईनगर

    मुक्ताईनगरात गुटखा विक्री सर्रासपणे सुरू

    saimat teamBy saimat teamDecember 7, 2020No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर ः प्रतिनिधी
    तालुक्यात गुटखा व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणात व सर्रासपणे सुरू असताना देखील पोलीस अधिकारी व प्रशासन आर्थिक हितसंबंध जोपासत आहे. तसेच अवैद्य वाळू विक्रेत्यांवर कार्यवाही ही योग्य आहे. परंतु अवैध गुटखा व्यावसायिकांवर कार्यवाही करण्यात महसूल प्रशासन तसेच पोलीस प्रशासन दिरंगाई करत असल्याचे दिसून येत आहे.
    मुक्ताईनगर तालुका हा मध्यप्रदेश सीमेलगत असून मध्यप्रदेशात गुटखा बंदी नसल्यामुळे तेथून सीमा पार करत महाराष्ट्रात गुटखा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच मुक्ताईनगर शहरात गुटखा हा जितका मध्य प्रदेश मधून येतो त्यापेक्षा जास्त हा जळगाव, भुसावळ व इतर ठिकाणी पुरवला जात आहे. राज्य सरकारने गुटखा बंदीचा निर्णय घेऊन खूप चांगले पाऊल उचलले आहे. परंतु अधिकारी मात्र याचा गैरफायदा करत स्वतःचे खिसे तर भरत नाही ना? याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून तपासणी देखील केली पाहिजे. शहरात प्रत्येक टपरीवर, व गाडीवर घुटका हा सर्रासपणे विकला जातो. लाजिरवाणी बाब अशी की ज्या ठिकाणी मुक्ताईनगर मध्ये मध्य सेंटरला परिवर्तन चौकामध्ये कोरोना काळामध्ये तात्पुरत्या स्वरूपाची पोलीस चौकी बसवली असूनही या पोलीस चौकीच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सर्रासपणे केली जात आहे. काही नागरिक तर पोलीस चौकीच्या मंडपामध्ये बसून गुटखा खाऊन पिचकार्‍या मारत असतात. गुटखा ज्या ठिकाणी येतो त्यावर तर कारवाई होत नाही परंतु सर्रास विक्रीवर सुद्धा कुठलीही कारवाई होताना आढळून येत नाही व कोणताही अधिकारी कार्यवाही करत नाही. अनेक दुकानांमध्ये गुटखा समोर ठेवून होलसेल विक्री केली जाते.
    व्यापारी संपूर्ण तालुकाभरात खुलेआम घुटका विक्री करतात. यांची मुजोरी इतकी वाढली आहे की ते कोणत्याही अधिकारी व प्रशासनाला घाबरत नाही का? मोठा आर्थिक व्यवहार होतो म्हणूनच तर नाही ना, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. याबाबत संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी ही नागरिकांमधून होत आहे.
    शहरात गेल्या काही महिन्यांपासून अवैद्य दारू विक्रेते व वाळू माफियांवर प्रशासनाने पंजा कसला असून त्यांच्यावर कार्यवाही होताना दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर त्यात राजकारणही खूप रंगवले गेले. परंतु या सर्व कार्यवाहीत मात्र अवैद्य गुटका माफियांवर एकही कार्यवाही झालेली नाही तसेच एकही ठिकाणी साधी एक गुटख्याची पुडी देखील पकडली गेली नाही का? मध्य प्रदेशातून येणारा गुटखा तसेच जळगावकडून येणारा गुटखा पकडला गेला नाही याचे कारण अद्याप पर्यंत गुलदस्त्यातच आहे. मात्र, सुज्ञ नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. दारू व वाळू अवैद्य विक्री होत असल्यास त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांधून होत आहे.
    मुक्ताईनगर तालुक्यात या अवैध गुटखा विक्री किंवा मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुरवठा करणारा अजूनपर्यंत का आढळला नाही. तसेच शहरामध्ये विविध ठिकाणी अवैधरित्या देशी-विदेशी दारूची घरांमधून अथवा बाहेरून खुलेआम विल्हेवाट केली जात आहे. यामध्ये प्रशासनाचा व राजकीय वरदहस्ताचा आशिर्वाद असल्याची चर्चा देखील नागरिकांमध्ये सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Muktainagar : मुक्ताईनगरात मानवाधिकार दिन साजरा

    December 13, 2025

    Muktainagar : जळगावमध्ये पशूवैद्यकीय महाविद्यालय सुरू करा

    December 12, 2025

    Muktainagar : मुक्ताईनगरमध्ये पीएम आवास योजनेंतर्गत अनियमिततेची चर्चा

    December 11, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.