मुकुंद सपकाळे यांना समता पुरस्कार घोषित

0
17
जळगाव प्रतिनिधी 
 बहुजन चळवळीतील जेष्ठ नेते , अन्यायाला सातत्याने प्रतिकार करून वंचित, शोषित, पिडीत घटकांसाठी अहोरात्र परिश्रम घेणारे लढाऊ संघर्षशील नेतृत्व मुकुंद सपकाळे यांना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे  2021 – 22  यावर्षीसाठीचा महात्मा फुले समता पुरस्कार घोषित केलेला आहे . सदर पुरस्कार दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पबचत भवन येथे  महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटिल यांच्या हस्ते देण्यात येणार आहे . अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक समता परिषदेचे राज्य अध्यक्ष भरत शिरसाठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे .
    मुकुंद सपकाळे यांनी विद्यार्थीदशेपासुन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवलेला आहे . तसेच गेल्या 35 वर्षांपासून त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन , घाटकोपर व खैरलांजी अत्याचार प्रकरणीचे आंदोलन  रद्द करणेसाठीचे आंदोलन व शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठीचे आंदोलन  तसेच  विविध सामाजिक आंदोलने केलेली असुन सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केलेले आहे तसेच भारतीय संविधानाची मानवी मूल्य व घटनात्मक मूल्य समाजात प्रतिष्ठित करण्यासाठी संविधानाचा प्रचार व प्रसार करून संविधान जागर करण्याचे कार्य केलेले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here