मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? गृहमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; बोलावली तातडीची बैठक

0
24

मुंबई : प्रतिनिधी 

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तान संघटित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. काल पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या दहशतवाद्यांचा मुंबईची लोकल उडवण्याचा प्लॅन असल्याचे उघड झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील  आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आज तातडीने पोलिसांची बैठक बोलावली आहे.

 

दिलीप वळसे-पाटील यांनी या बैठकीबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “दिल्लीत सहा अतिरेक्यांना अटक करण्यात आली. देशाच्या स्तरावरील ही घटना आहे. त्यामुळे या प्रकरणाची माहिती घेण्याच्या संदर्भात बैठक बोलावली आहे. या बैठकीतील कायदेशीर माहिती घेतल्यानंतरच त्यावर अधिक भाष्य करता येईल. तसेच, या बैठकीला पोलिसांच्या सर्व युनिटचे बडे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही सांगितले जात आहे.

दिल्लीत पकडलेल्या दहशतवाद्यांचा मुंबई लोकलमध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणण्याचा प्लॅन होता, अशी माहिती उघडकीस आली. मुंबईसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याचा कट तपास यंत्रणांनी उधळून लावला आहे. मुंबईतल्या जान मोहम्ममद शेखचे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचेही सांगितले जात आहे. तसेच शेख हा धारावीतील रहिवाशी आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दहशतवादी हल्ले करण्यासाठी आलेल्या सहा जणांना अटक केली आहे. यामधील दोघांना पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने (ISI) प्रशिक्षण दिल्याचे समोर आले. या स्पेशल सेलने पाकिस्तानने फंडिंग केलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. ISIने दिल्ली, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांत सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here