Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुंबई, पुणे, नाशिकच्या धर्तीवर गोदावरीतही दुर्मिळ पिच्युटरी ग्रंथीच्या ट्यूमरवर शस्त्रक्रिया
    जळगाव

    मुंबई, पुणे, नाशिकच्या धर्तीवर गोदावरीतही दुर्मिळ पिच्युटरी ग्रंथीच्या ट्यूमरवर शस्त्रक्रिया

    saimat teamBy saimat teamJanuary 8, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    मुंबई, पुणे, नाशिकच्या धर्तीवर गोदावरीतही दुर्मिळ पिच्युटरी ग्रंथीच्या ट्यूमरवर शस्त्रक्रिया
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव – मुंबई, पुणे, नाशिकच्या धर्तीवर गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात न्यूरोसर्जन, कान-नाक-घसा तज्ञ, एन्डोक्रोनॉलॉजी तज्ञांच्या सहकार्याने पिच्युटरी ग्रंथीतील ट्यूमवर यशस्वी शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली.

    शिरपूर येथील रहिवासी असलेल्या प्रौढावस्थेतील रुग्णाला अनेक दिवसांपासून डोके दुखण्याची समस्या होती. अचानक त्याच्या उजव्या डोळ्याची दृष्टी बंद झाली, पापणीही पडल्याने नातेवाईक घाबरले, औरंगाबादपर्यंत उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यानंतर जळगाव येथील न्यूरोजसर्जन डॉ.स्वप्नील पाटील यांना रुग्णासह नातेवाईक भेटले, रुग्णाची समस्या लक्षात घेवून एमआरआयचा रिपोर्ट पाहिला असता रुग्णाला मेंदूच्या पायथ्याशी ट्यूमर आणि सभोवताली रक्‍तस्त्राव झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. याप्रसंगी कान-नाक-घसा तज्ञ डॉ.विक्रांत वझे, एन्डोक्रोनॉलॉजी डॉ. चिमु चोपडे यांच्याशी न्यूरोलॉजिस्ट डॉ.स्वप्नील पाटील यांनी चर्चा केली. चर्चेअंती डॉ.स्वप्नील पाटील, डॉ.विक्रांत वझे, डॉ.चिमु चोपडे यांनी पिच्यूटरी ग्रंथीची गुंतागुंतीची असलेली शस्त्रक्रिया भुलतज्ञ डॉ.शितल, डॉ.देवेंद्र यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडली.

    दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया
    पिच्यूटरी ट्यूमर ही एक मोठी शस्त्रक्रिया असून त्यासाठी रुग्ण मुंबई, पुणे, नाशिक येथे जातात मात्र ही सुविधा डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपलब्ध आहे. कुठल्याहीप्रकारची चिरफाड न करता नाकावाटे आणि दुर्बिणीद्वारे ५ तासांच्या कालावधीत ही शस्त्रक्रिया झाली. यात मेंदूतील रक्‍तवाहिन्या फुटणे, मेंदूतुन पाणी गळणे, कोमात जाणे, डोळे पूर्णत: जाणे अशी रिस्क होती मात्र आम्हा तज्ञांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
    – डॉ.स्वप्नील पाटील, न्यूरोसर्जन

    टिमवर्कद्वारे रुग्णाची त्रासातून सुटका
    शस्त्रक्रियेआधी आणि नंतरही रुग्णाची पेरिमेट्री चाचणी करण्यात आली, यातून दृष्टीपटलाची क्षमता आली, आम्ही टिमवर्कने शस्त्रक्रिया केली आणि त्याला यश आले. रुग्णाला दिसायला लागले, त्याचप्रमाणे पडलेली पापणीही काही अंशी वर जात आहे. एकाच छताखाली स्पेशालिस्ट डॉक्टरांची फळी असल्याने पिच्यूटरी ग्रंथीतील ट्यूमर पूर्णत: काढण्याची शस्त्रक्रिया झाली असून रुग्णाची त्रासातून सुटका झाली.
    – डॉ.विक्रांत वझे, कान-नाक-घसा तज्ञ

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : तरुण मजुराचा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

    February 14, 2026

    Jalgaon : कर्जबाजारी शेतकऱ्याची विषप्राशनातून आत्महत्या

    February 14, 2026

    Jalgaon : साई गजानन रेसिडेन्सीतील १८ दुचाकी जळून खाक माथेफिरूच्या कृत्याचा संशय

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.