जळगाव ः प्रतिनिधी
येथील संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठान, समस्त माळी समाज पंच मंडळातर्फे वर-वधू मेळावा-२०२१ च्या सूचीचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप पाटील हे होते. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन दिलीप महाजन (पाळधी), ज्येष्ठ समाजसेवक धोंडीबा महाजन, उद्योजक संजय महाजन, प्रदीप महाजन उपस्थित होते. पोलीस दलातील एकनाथ महाजन यांचा सत्कार करण्यात आला. विजय महाजन, जयंत इंगळे, शरद मोरे, सुनील महाजन, गोपाळ चौधरी, वाय.एस. महाजन, डी.बी. महाजन, धनराज माळी, वैशाली महाजन यांनी सहकार्य केले.