मातृदिनी भुसावळ ग्रामीण रुग्णालयाला दिल्या १२ खुर्च्या, चार कपाटे अन् तीन ऑक्सिमीटर

0
40

भुसावळ : प्रतिनिधी
येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमध्ये तालुका व परिसरातील नागरिकांवर उपचार होत आहेत. ग्रामीण रुग्णालयात अनेक संसाधनांची कमतरता असल्याने मदतीचे हात पुढे येत आहेत. यात माजी नगरसेवक प्रकाश बतरा व त्यांच्या मातोश्री नगरसेविका पुष्पा बतरा यांनी रविवारी ४ कपाट, १२ खुर्च्या, ३ पल्स ऑक्सिमीटर भेट दिले. यावेळी आमदार संजय सावकारे उपस्थित होते. मातृदिनानिमित्त माजी नगरसेवक प्रकाश बतरा यांनी हा उपक्रम राबवला.
सुमारे ६२ हजार रुपयांच्या या साहित्याचे आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते वितरण झाले. यावेळी डॉ.भालचंद्र चाकूरकर, डॉ. शुभांगी फेगडे, डॉ. सिद्धेश पाटील, डॉ. वैभव निकम, डॉ. नी. तू. पाटील, भाजप शहराध्यक्ष परीक्षित बर्‍हाटे, अजय नागराणी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, अमोल महाजन, संदीप सुरवाडे, युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, सरचिटणीस नंदकिशोर बडगुजर, रुग्णालय स्टाफ एलियास शेख, गणेश चौधरी, गुलशन वादवाणी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here