Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»माणसांना जोडतो तो धर्म व तोडतो अधर्म – डॉ. पारनेरकर
    जळगाव

    माणसांना जोडतो तो धर्म व तोडतो अधर्म – डॉ. पारनेरकर

    saimat teamBy saimat teamOctober 19, 2021No Comments5 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    माणसांना जोडतो तो धर्म व तोडतो अधर्म - डॉ. पारनेरकर
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । इस्लाम धर्म व त्यावर अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद यांनी प्रत्यक्षात आचरण करून दाखवलेले चरित्र यांचा ताळमेळ म्हणजेच इस्लाम धर्म होय. इस्लाम धर्मात आतंकवाद, धर्मपरिवर्तन व लव जिहादला थारा नसल्याचे मत इस्लाम धर्माचे मराठीचे गाढे अभ्यासक डॉक्टर सय्यद रफिक पारनेरकर व डॉक्टर इक्राम काटे वाला यांनी मांडले.

    तर इस्लाम धर्माच्या शिकवणी नुसार आपले जीवन व्यतीत करून दाखविले त्या बाबत डॉ इक्राम खान हे बोलत होते.

    ईद-ए-मिलादुन्नबी अर्थातच हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी आयोजित व्याख्यानमालेत जळगाव जिल्हा पत्रकार संघात हे वक्ते बोलत होते. व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थानी जळगाव शहर काजी व मस्जिद उमर चे इमाम मुफ्ती अतिकुर रहेमान होते.

    प्रेषितांचे जीवन चरित्र – डॉक्टर इक्रामखान

    यांनी आपल्या चाळीस मिनिटाच्या व्याख्यानामध्ये अंतीम प्रेषितांचे ६२ वर्षाची जीवनगाथा सादर केली त्यात त्यांनी मक्का मधील १३ वर्ष व मदिना मधील १० वर्ष यावर प्रकाश टाकला .अंतीम प्रेषितांचे संदेश हेच जीवन योग्य आहे हे सांगताना त्यांनी विविध दाखले सादर केले त्यात दहशतीचा नायनाट करून चांगला समाज कसा निर्माण करता येतो ते त्यांनी पैगंबरांच्या दहा वर्षातील ८६ युद्धा द्वारे दाखवून दिलं तसेच नैतिक तेला धार्मिकतेशी जोडले तरच सद्गुण निर्माण होतात हे त्यांनी पटवून दिले. अंतिम प्रेषितांनी पददलित लोकांना गुलामगिरीतून मुक्त करून राज्यकर्ते बनवले अशा १४ गुलामांचे त्यांनी उदाहरण दिले तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्रियांना मालमत्तेत हक्क देऊन त्यांना धार्मिक शिक्षण देण्याचा व घेण्याचा हक्क दिला,एवढेच नव्हे तर ते स्रिया हे आपल्या घराबाहेर पडून व्यवसाय, शिक्षण, नोकरी करू शकतात म्हणूनच त्यांना हिजाब (पडदा) करून घराबाहेर पडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.

    धर्मांतरण म्हणजे विचार व आचारांचा बदलाव -डॉक्टर रफिक पारनेरकर

    इस्लाम धर्मात जबरदस्तीने धर्मांतरणास सक्त मनाई केलेली आहे. धर्मांतरण म्हणजे भाषांतर, वेषांतर किंवा नामांतर नसून ते आपल्या विचारांचा व आचारांचा बदल करून काय खरे आहे व काय चांगले आहे त्याचा निर्णय घेऊन केलेले कार्य म्हणजे धर्मांतरण होय. धर्मांतरण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून तो निर्णय व्यक्तिशः घेऊ शकतो.

    तसेच इस्लाम धर्मात लव जिहाद ला सुद्धा थारा नाही जर इस्लाम धर्म व अंतिम प्रेशितांचे जीवन चरित्र हे दर्शवते की जर कोणी अविवाहित पुरुष अथवा स्त्री ने व्यभिचार केला तर तिला चाबकाने मारण्याची शिक्षा आहे व विवाहित स्त्री अथवा पुरुषाने व्यभिचार केला तर त्याला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा धर्म शिकवतो, परस्त्रीला बघू नये जर पहिली नजर पडली तर ती माफ आहे परंतु जर दुसऱ्यांदा तुम्ही परस्त्रीला बघितले तर तुम्ही पापाचे केले असे धर्म म्हणतो त्यामुळे लव जिहाद चा प्रश्न इस्लाम मध्ये नाही.

    आतंकवाद बाबत बोलताना पारनेरकर यांनी जो धर्म पवित्र कुराणातच्या माध्यमाने शिकवण देतो की ज्याने एका निष्पाप व्यक्तीची हत्या केली त्याने पूर्ण मानवजातीची हत्या केली. प्रेषित एका यहूद्या ची अंतयात्रा जात असताना सन्मानाने उभे राहून त्यांना सन्मान देता म्हणजे जे प्रेषित एका मृतात्म्यास सन्मान देतो त्या व्यक्तीची शिकवण जिवंत माणसाचा जीवे मारण्याची असु शकते का? असा प्रश्न उपस्थित करून आतंकवादला इस्लाम मध्ये कोणत्याही प्रकारचा थारा नाही हे त्यांनी विविध उदाहरणासहीत स्पष्ट केले.

    समाजाने प्रेषितांचे चारित्र्य ची अंमलबजावणी करावी मुफ्ती अतिक

    अध्यक्षीय भाषणात मुफ्ती अतिकउर रहमान यांनी अंतिम प्रेषितांनी पवित्र कुराणावर आधारित आपले चरित्र ६२ वर्षा च्या वया पर्यंत अप्रत्यक्षरीत्या व्यतीत करून दाखवले त्यानुसारच प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात ही तत्वे अंगिकारले असता तेच खरे समाज हितचिंतक असून ईश्वर त्यांना त्यांच्या चांगल्या कर्माचे फळ निश्चित देईल व प्रत्येक समाजात सुसंवाद द्वारेच आपसातील गैरसमज दूर होतील व असे कार्यक्रमाचे आयोजन होणे आवश्यक असल्याचे मत मुफ्ती अतिकउर रहमान यांनी व्यक्त केले

    पुस्तकी ज्ञान देऊन औपचारिक उद्घाटन

    या व्याख्यानमालेचे औपचारिक व अत्यंत वेगळ्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले साने गुरुजी लिखित इस्लामी संस्कृती हे पुस्तक जळगाव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे ,क्रीडाशिक्षक संजय पाटील, महिला सुरक्षा समितीच्या निवेदिता ताठे व आंतरराष्ट्रीय खेळाडू योगेश्वर धांडे यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमुख अतिथी च्या हस्ते पुस्तक देऊन या व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले.

    कार्यक्रमा द्वारे सुसवादाची आवश्यकता का ? – फारूक शेख
    कार्यक्रमाचे आयोजक मानियार बिरादारीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी आपल्या प्रास्ताविक द्वारे कार्यक्रमा द्वारे,प्रत्यक्ष भेटीत, एक मेकाच्या सुख दुःखात आम्ही भेटून जर आपसातील मतभेद,गैर समज दूर केले तर एक चांगला समाज निर्माण होईल व आम्ही सर्व गुण्यागोविंदाने राहू शकतो म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे मत व्यक्त केले

    प्रश्न- उत्तराने समाधान झाले, संजय पाटील

    दोघी वक्त्यांचे भाषण झाल्यावर थेट प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम घेण्यात आला त्यात संजय पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय वाघमारे, गुप्तवार्ता विभागाचे भाऊसाहेब पाटील, ज्येष्ठ उर्दू पत्रकार अली अंजुम रिजवी, महिला सुरक्षा समिती सदस्या निवेदिता ताठे आदींनी प्रश्न विचारले असता त्यांचे समाधानकारक उत्तरे डॉक्टर रफिक पारनेरकर डॉक्टर इकराम खान यांनी दिले.

    प्रमुख अतिथीचे स्वागत
    मानियार बिरादारीचे सैयद चाँद, फारूक शेख व ताहेर शेख यांनी तिघी प्रमुख अतिथींना सन्मान चिन्ह व शाल देऊन स्वागत केले।

    कार्यक्रमाला यांची होती उपस्थिती
    वकील संघाचे एडवोकेट दिलीप बोरसे, दिलीप चौधरी, डी के पाटील, मिलिंद केदार, निवेदिता ताठे, दिनेश पाटील, सौरभ कुलकर्णी ,अनंत देशमुख, संजय पाटील, प्रवीण ठाकरे, वाल्मीक पाटील, कौस्तुभ शिंदे, हिरालाल बडगुजर, अरुण सपकाळे, सचिन धांडे, जवाहर देशमुख, मनोज व्यास, डॉक्टर यश बोंडे, दिनेश पाटील, शैलेंद्र पाटील, हेमराज चव्हाण, जमात ए इस्लामी चे समी सहाब, सोयल आमिर, प्रोफेसर डॉक्टर एम इक्बाल, कुल जमातीचे सय्यद चांद, ताहेर शेख, मुजाहिद खान,अखतर शेख, वहिदत चे अतीक शेख, सत्य प्रचार चे कादर शेख, मुस्तफा शेख, वहीद सय्यद, फहिम पटेल, अश्फाक पिंजारी, कामिल शेख, मुस्ताक करिमी, अन्वर खान, अझीझ शिकलकर, पंडित जाधव ,सय्यद मुमताज अली, रफीकउद्दीन शेख ,सोहेल ताहेर ,सलाउद्दीन नदीब,रईस बागवान, सईद पटेल, उमर फारूक, कयूम असर, आसिफ खान, अनिस शाह, शेखु शेख,रईस बागवान,अल्ताफ शेख आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात रफिक पटवे यांच्या कुराण पठाणाने तर हुजेफा अतिक यांच्या नात पठाणाने करण्यात आली.कार्यक्रमाचे कुल जमातीचे जाकीर खान यांनी तर आभार सत्य प्रचार चे मुस्तफा शेख यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon Police : जळगाव पोलीस दलाची कारवाई; १९ गुन्ह्यांमधील ७१० किलो गांजा नष्ट

    December 24, 2025

    Jalgaon : अल्पवयीन मुलीचे अपहरण

    December 24, 2025

    Jalgaon : जिल्ह्यात ‘सेवादूत प्रकल्पा’द्वारे शासकीय सेवा घरपोच

    December 24, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.