जळगाव ः प्रतिनिधी
मनपाचे माजी उपमहापौर तथा कोळी समाज संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश बुधो सोनवणे (वय ५९) यांचे मंगळवारी दुपारी कोरोनाच्या संसर्गाने निधन झाले. गेल्या चार ते पाच दिवसापासून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते.
तत्कालिन महापौरांनी राजीनामा दिल्याने सोनवणे यांच्याकडे काही दिवस महापौरपदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला होता. ते राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे यांचे वडील होत. गेल्या वर्षी चार माजी नगरसेवकांचा कोरोनाने बळी घेतला होता. त्यापाठोपाठ माजी गणेश सोनवणे यांचे देखील निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ मुली असा परिवार आहे.