महिला हॉकी स्पर्धा जिंकणारच हे ध्येय ठेवून क्रीडागणामध्ये उतरा – महापौर

0
49

जळगाव, प्रतिनिधी । ११ नोव्हेंबर पासून पुणे येथे एस एन बी पी क्रीडा संस्थेच्या माध्यमाने राज्यस्तरीय हॉकी महिला च् स्पर्धेला सुरुवात झाली असून या अत्यंत महत्त्वाच्या आमंत्रिताच्या स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्याच्या स्पोर्ट्स हाऊसच्या संघाला सुद्धा प्रवेश मिळाला असून त्यासाठी जळगाव जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला व त्या संघाला श्री छत्रपती शिवाजी महाराज किडा संकुल येथे शुभेच्छा देण्यासाठी जळगाव महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन ,रायसोनी एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉक्टर प्रीती अग्रवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित व हॉकी जळगाव चे सचिव फारुक शेख यांची उपस्थिती होती.

जीवनात जिंकण्याचे ध्येय ठेवा- महापौर जयश्री महाजन

महिला खेळाडूंना शुभेच्छा देताना महापौर जयश्री महाजन यांनी महिला या कोणत्याही क्षेत्रात मागे नसून ते आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे त्याला कारण स्वतःमधील आत्मविश्वास व संघर्षाची जिद्द असल्याने आपण आज बरोबरीत काम करीत आहोत जिंकण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच क्रीडांगणावर उतरा व जिंकून या असे भावनिक आव्हान सुद्धा त्यांनी खेळाडूंना केले.

 शिक्षण सोबतच क्रीडा क्षेत्रात करियर करा –  डॉक्टर प्रीती अग्रवाल

 शैक्षणिक क्षेत्रात महिलांसाठी करियर असले तरी क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आज महिलांना विविध संधी उपलब्ध असून त्यामुळे ते आपल्या व आपल्या कुटुंबियांचे चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करू शकतात त्यासाठी ठराविक शिक्षण पद्धती चे अवलंब न करता सर्वसमावेशक अशा शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावा व त्यासोबत क्रीडा क्षेत्रात खेळत राहिल्यास त्याचा उपयोग आपल्या खाजगी आयुष्यात निश्चित होतो असे त्यांनी खेळाडूंना सांगितले.

 महिलांना हॉकी साठी चांगले दिवस – मिलिंद दीक्षित

 नुकत्याच झालेल्या ऑलंपिक स्पर्धेत भारताच्या महिला व पुरुष सदस्यांनी अत्यंत चोख कामगिरी पार पाडल्याने भारताला हॉकी मध्ये चांगले दिवस आले असल्याने आपण जळगावकर महिलांनी सुद्धा या चांगल्या दिनाचे आपल्या दैनंदिन जीवनात कसा फायदा होईल हे करून घ्यावे असे आवाहन केले.

जळगाव क्रीडा क्षेत्रासाठी स्पोर्ट हाऊस आपल्या सेवेला हजर – फारुक शेख 

क्रीडा क्षेत्रात योगदान करण्यासाठी जळगावातील विविध संस्था, संघटना, औद्योगिक क्षेत्र व दानशूर व्यक्तिमत्व मदत करण्यास तयार असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरातील स्पोर्ट हाऊस सुद्धा प्रयत्नशील असल्याने स्पोर्ट हाऊसचा  हॉकी चा संघ निश्चितच या आमंत्रित्यांच्या स्पर्धेत चांगली कामगिरी पार पडेल व जळगाव चे नाव अजरामर करेल अशी आशा हॉकी जळगावचे सचिव तथा स्पोर्ट होऊस चे संचालक फारुक शेख यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षक लियाकत अली सय्यद तर आभार संघाच्या  सहव्यवस्थापिका हिमाली बोरले यांनी केले

जळगाव जिल्ह्याचा निवड झालेला स्पोर्ट्स हाउस महिलांचा संघ

भाग्यश्री कोळी, निशा कोंडाळकर भाग्यश्री शिंपी, दिव्या शिंपी,सुनैना राजपाल,नूतन शेवाले, सायली खंडागळे,दीपिका सोनवणे,हिमाली बोरोले,सरला अस्वार, गायत्री अस्वार, रुपाली अस्वार, आरती ढगे, निकिता पवार, वैष्णवी चौधरी, अश्विनी वंडोळे,रोशनी राठोड,ममता नाईक प्रशिक्षक म्हणून लियाक़त अली सैयद तर व्यवस्थापक म्हणून सत्यनारायण पवार व सह व्यवस्थापक म्हणून हिमाली बोरोले यांची निवड हॉकी जळगांव चे फारूक शेख यांनी घोषित केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here