महिला सबलीकरण हेच राष्ट्राचे ध्येय ः प्राचार्य डॉ.किसन पाटील

0
56

जळगाव ः प्रतिनिधी
सत्यशोधक साहित्य परिषदेतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थात महिला शिक्षण दिनानिमित्त अथर्व पब्लिकेशनच्या कार्यालयात आज सकाळी प्रतिमापूजन व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.प्राचार्य डॉ. किसन पाटील अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी डॉ. पाटील यांनी, महिला सबलीकरण हेच राष्ट्राच्या विकासापुढील ध्येय असले पाहिजे असा निर्धार आपण सर्वांनी केला पाहिजे, असे प्रतिपादन केले.
प्रमुख पाहुणे महापालिका शिक्षण समितीचे सभापती सचिन पाटील यांनी सावित्रीबाईंचे कार्य हे महिलांना प्रेरणा देणारे असून, त्यांच्या कणखर वृत्तीचे आचरण प्रत्येक महिलेने केले पाहिजे, असे आवाहन केले.विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश मोरे यांनी सावित्रीबाईंच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला. सत्यशोधक साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. मिलींद बागुल यांनी सावित्रीबाई फुले यांनी दाखविलेल्या शिक्षणाच्या वाटेवर चालण्याशिवाय प्रगती नाही, असे सांगितले.
याप्रसंगी डॉ.सत्यजित साठवे, अथर्व पब्लिकेशन्सचे संचालक युवराज माळी, कुमुद पब्लिकेशन्सच्या संचालिका संगीता माळी, शिक्षण बापूराव पानपाटील, विजय लुल्हे, ज्येष्ठ पत्रकार दीपक महाले, स्वप्नील फलटणकर, गिरीश चौगावकर, दीपक साळुंखे, सुनिल महाजन, सुनील पाटील, सगीर शेख आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. पाटील, डॉ. साळवे, डॉ. बागूल यांनी मनोगत व्यक्त केले. महिला शिक्षण दिनाचे औचित्य साधून दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. युवराज माळी यांनी प्रास्ताविक केले. बापूराव पानपाटील यांनी सूत्रसंचालन केले. विजय लुल्हे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here