यावल ः ता.प्रतिनिधी
शहरातील तिरुपतीनगर मधील महिला गार्डनचे संरक्षण भिंतीचे काम दक्षिण बाजुने अपूर्ण ठेवल्याने ठेकेदाराने संरक्षण भिंतीचे काम अपूर्ण का ठेवले? बांधकामास कोणी विरोध केला आहे का? तसेच शासकीय कामकाजात अडथळा आणला म्हणून ठेकेदाराने किंवा नगरपालिका मुख्याधिकारी, नगरसेवकानी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई का केली नाही? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून महिला उद्यानाच्या संरक्षण भिंतीचे काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
शहरातील तिरुपतीनगर परिसरातील खुल्या जागेवर, ओपन स्पेस जागेवर यावल नगरपरिषदेमार्फत महिलांसाठी उद्यानाचे बांधकाम करण्यात येत आहे. या खुल्या जागेला चारही बाजुने संरक्षण भिंत बांधण्यात आली. उद्यानासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवलेले असताना सुद्धा दक्षिणेकडील रस्त्यावर एक भला मोठा ट्रक उद्यानात प्रवेश करू शकतो, इतकी मोकळी जागा सोडून संरक्षण भिंत कंपाऊंड अपूर्ण ठेवल्याने (रिकाम टेकड्यांना काही तरुण आणि पुरुषांना) भविष्यात महिलांच्या उद्यानात येणार्या-जाणार्या महिलांची छेडखानी करण्यासाठी (प्रेम प्रकरणासाठी लव जिहाद लॅण्ड जिहाद म्हणून) जागा मोकळी, पळवाट ठेवण्यात आली असल्याचे संपूर्ण यावल शहरात बोलले जात असून याकडे यावल नगरपरिषद मुख्याधिकारी व नगरसेवक यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. ठेकेदाराने कंपाऊंड, संरक्षण भिंतीचे काम अपूर्ण का ठेवले? बांधकामास विरोध करणार्या विरुद्ध आणि शासकीय कामकाजात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल का केला नाही? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून यावल नगरपरिषदेने ठेकेदारामार्फत पोलीस बंदोबस्तात सर्व समाज हितासाठी महिला उद्यानाच्या कंपाउंडचे काम पूर्ण करावे. अन्यथा, तिरुपतीनगर परिसरातील सर्व महिला नागरिकांतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे. म्हणन कायदा व सुव्यवस्था शांतता तसेच जातीय सलोखा कायम राहण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित सर्व यंत्रणेने मंजूर प्लॅन इस्टिमेटप्रमाणे महिला उद्यानाच्या कंपाऊंडचे काम तात्काळ कोणताही बदल न करता पुर्ण करावे, असे यावल शहरात बोलले जात आहे.