महावितरणाविरोधात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन

0
21

जळगाव ः जिल्हा प्रतिनिधी
महावितरणने ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप केले. महावितरणाच्या या कृतीच्या निषेधार्थ काल रोजी धरणगाव तालुका भाजपाने महावितरण केंद्रांवर टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन केले.
भारतीय जनता पार्टीचे नेते पी.सी.आबा पाटील यांनी आपल्या भाषणात महावितरणच्या कारभारावर टीकास्त्र सोडले.वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्या, राज्यातील ७२ लाख वीज जोडण्यांचा पुरवठा खंडीत करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरीत मागे घ्यावा,फडणवीस सरकारच्या काळात आम्ही कधीच शेतकर्‍यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही,असे सांगितले व महावितरण कार्यालयांना टाळे ठोकले.
तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील म्हणाले की, कोरोना काळात जनतेला वीज बिल माफीचे आश्‍वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसूली करून जनतेला नाहक त्रास देत आहे.तसे झाल्यास महावितरणला वेठीस धरू.नगरसेवक गुलाब मराठे आपल्या भाषणात म्हणाले की, थकीत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. अ‍ॅड.वसंतराव भोलाणे यांनी आपल्या भाषणात, आम्ही या आघाडी सरकारला मनमानी कारभार करू देणार नाही असा इशारा देत भाजपाचे कार्यकर्त रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असे ठणकावले.
मधुकर रोकडे यांनी वीज पुरवठा खंडीत करण्यास येणार्‍या महावितरणच्या कर्मचार्‍यांना भाजपचे कार्यकर्ते अटकाव करतील असे स्पष्ट केले.
कोरोनाकाळात अवाजवी वीज बिल आल्यावर ती बिले भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही. विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरीही वीज बिल भरण्याच्या अवस्थेत नाही.अवाजवी बिलं दुरुस्त करण्याची घोषणाही प्रत्यक्षात आली नाही.कोरोना प्रसारापुर्वी या सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच १०० युनिट पर्यंतचे वीज बिलं माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते,हे आश्‍वासनही प्रत्यक्षात आले नाही. जर दिलेली आश्‍वासने पूर्ण करायची धमक नसेल तर निदान अशी सक्तीने वीज बिलं वसूली करून आधिच आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकू नका.‘वीज बील भरा नाहीतर व वीज पुरवठा खंडीत करू’ असा निर्णय घेणार्‍या महाविकास आघाडी सरकारची असंवेदनशीलता पुन्हा दिसली आहे,अशी टीका भारतीय जनता पार्टीने पत्रकाद्वारे केली आहे.
या आंदोलनप्रसंगी शिरिषआप्पा बयस,पुनीलालआप्पा महाजन,शहराध्यक्ष दिलीप महाजन,गटनेते कैलास माळी सर,तालुका सरचिटणीस ललित येवले,सुनिल पाटील,शरदअण्णा धनगर,भालचंद्र माळी,कडूआप्पा बयास,सुनिल चौधरी,डोंगर चौधरी,मधुकर पाटील,संजय पाटील,राजू महाजन,टोनी महाजन,कन्हैया रायपूरकर,शरद भोई,मच्छिंद्र पाटील,जुलाल भोई,बिपीन अमृतकर,समाधान पाटील,जितेंद्र चौधरी,रवी पाटील,योगेश महाजन,निलेश महाजन,विक्की महाजन,कृष्णा महाजन,प्रदीप महाजन इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here