जळगाव : प्रतिनिधी
अंतर्नाद प्रतिष्ठान व शिक्षण विभाग पंचायत समिती भुसावळ यांच्या सयुंक्त विद्यमाने शिवजयंतीच्या निमित्ताने फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन महावक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती.यंदा स्पर्धेचे चौथे वर्ष होते.चार गटातील १७ विजेत्यासह सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक यांना गौरवण्यात आले.
अध्यक्षस्थानी भुसावळ नगरपालिका शिक्षण मंडळ सभापती मुकेश गुंजाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष रघुनाथ सोनवणे,डॉ.भाग्यश्री भंगाळे, नूतन पतपेढी संचालक प्रदीप सोनवणे, खासगी प्राथमिक सोसायटी संचालक प्रसन्ना बोरोले ,म. रा. अपंग कर्मचारी व अधिकारी संघटना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अनिल देशपांडे यांची उपस्थिती होती.
स्पर्धक, पालक, प्रमुख पाहुणे आणि अंतर्नादच्या सर्व सदस्यांची थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमिटरद्वारे तपासणी करुन आणि ही सर्व माहिती संकलित करून कार्यक्रम स्थळी सर्वांना प्रवेश देण्यात आला.फक्त विजेत्या स्पर्धकांसोबतच कार्यक्रम घेण्यात आला.सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून कार्यक्रमाला एकूण उपस्थिती हि ५० च्या आतच ठेवण्यात आली होती.
शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित वकृत्व स्पर्धेतील तिन गटातील १० विद्यार्थी यानुसार ३० विद्यार्थ्यांची अंतिम फेरी पु.ग.बर्हाटे शाळा येथे रविवारी पार पडली.परीक्षक म्हणून पि.जी.पाटील, एस एस जंगले,नाना पाटील, आनंद सपकाळे, प्रमोद आठवले, अनिल देशपांडे,मिरा जंगले, अरविंद पाटील यांनी काम पाहिले. अंतिम फेरी झाल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडला.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख संजय भटकर यांनी केले.शिक्षण आणि सामाजीक क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल योगेश इंगळे, समाधान जाधव आणि भूषण झोपे यांचा अंतर्नादतर्फे सन्मानपत्र देउन गौरव करण्यात आला.स्पर्धकातर्फे पालवी चौधरी हिने नमुना वकृत्व सादर केले त्यानंतर स्पर्धेच्या ८ परिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
उपक्रमास माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी, नगरसेवक मुकेश पाटील, स्त्री रोग तज्ञ डॉ. आशुतोष केळकर आणि नर्मदा शिक्षण मंडळ अध्यक्ष परिक्षीत बर्हाटे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी तर आभार स्पर्धा समन्वयक देव सरकटे यांनी मानले.यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान, विस्तार अधिकारी किशोर वायकोळे, स्पर्धा सह समन्वयक राजू वारके,राजेंद्र जावळे, वंदना भिरुड, अमितकुमार पाटील, निवृत्ती पाटील ,अमित चौधरी,ज्ञानेश्वर बोरोले, सचिन पाटील, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.
गटनिहाय अंतिम फेरीतील विजेते पहिला गट -प्रथम क्रमांक हंसिका नरेंद्र महाले (सेंट अलायसिस स्कूल भुसावळ) द्वितीय भाग्यश्री कल्पेश कुलकर्णी (जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर भुसावळ), तृतीय साक्षी अनिल हिवरकर (भुसावळ हायस्कूल) उत्तेजनार्थ राधिका प्रसन्ना बोरोले (तु.स झोपे प्राथमिक विद्यामंदिर, भुसावळ ), चेतना ज्ञानेश्वर बोरोले(ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ )
द्वितीय गट – प्रथम साक्षी शैलेशकुमार चौधरी (सेंट अलायसेस भुसावळ) द्वितीय रोशनी दिलीप सोनवणे (भुसावळ हायस्कूल, भुसावळ ),तृतीय चंदन पुरुषोत्तम पाटील( जि.प. शाळा टहाकळी) उत्तेजनार्थ सना गवळी, खुशी गजानन मोरे वरणगाव. तृतीय गट – तृतीय गटात प्रथम क्रमांक पालवी हेमंत चौधरी (के नारखेडे विद्यालय भुसावळ)द्वितीय सुविद्या संतोष शेळके (महात्मा गांधी विद्यालय वरणगाव) तृतीय क्रमांक अक्षदा सपकाळे, उत्तेजनार्थ प्राजक्ता तायडे (भुसावळ हायस्कूल भुसावळ), हिमानी जैन (गंगाधर सांडू चौधरी विद्यालय वरणगाव) चतुर्थ गट ( खुला गट )-प्रथम गजानन इंगळे( भुसावळ ) द्वितीय राजेंद्र पाटील ( साकरी )