जळगाव : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत आंबेडकरवादी जनसंघटनाची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक अजिंठा विश्रामगृहात घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाची स्थापना करून या मोर्चाच्या अध्यक्षपदी आंबेडकरी आंदोलनाचे संघर्षशील लढाऊ नेते मुकुंदराव सपकाळे यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा.प्रितीलाल पवार उपस्थित होते तर अध्यक्षपदाचा प्रस्ताव अमोल कोल्हे यांनी मांडून संजय तांबे,रमेश सोनवणे यांनी अनुमोदन करून जनक्रांती मोर्चाची सभासद नोंदणी मोठ्या संख्येनी करावी असे सूचित केले.
प्रास्ताविक हरिश्चंद्र सोनवणे यांनी करून सुत्रसंचलन चंदन बिर्हाडे यांनी केले. बैठकीस बाबुराव वाघ, माजी नगरसेवक राजु मोरे, संजय पाटील, श्रीकांत मोरे, दिलीप सपकाळे, धर्मेश पालवे, विजय करंदीकर,राहूल वाघ, राजू कोळी, वसंतराव पाटील, संदीप नन्नवरे, जयपाल धुरंधर, दादाराव शिरसाठ, किरण वाघ इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.शेतकरी-कष्टकरी, दलित शोषीत-उपेक्षितांच्या न्यायासाठी व त्यांच्या समस्यांसाठी सातत्याने संघर्ष करून विषमतेविरोधी जनआंदोलन उभारण्याचा संकल्प श्री.सपकाळे यांनी या प्रसंगी मनोगतात व्यक्त केला.
भारत बंदला पाठींबा
दिल्ली येथे तमाम शेतकरी संघटना एकत्र येऊन केंद्र सरकारच्या तीन काळे कृषी कायद्याच्या विरोधात एल्गार पुकारून गेल्या अकरा दिवसांपासून जे आंदोलन सुरु केले आहे त्या शेतकरी आंदोलनास महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने पाठींबा दिला असून दि. ८ डिसेंबर रोजी आयोजित भारत बंदच्या आंदोलनात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा सक्रीय सहभागी असून जळगाव जिल्हा बंदचे आवाहन मुकुंद सपकाळे यांनी या बैठकीत केले आहे.जिल्ह्यातील तमाम आंबेडकरवादी चळवळीत काम करणार्या कार्यकर्त्यांनी जिल्हा बंदच्या आंदोलनात सहभागी होऊन सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले आहे.