जळगाव : प्रतिनिधी
महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.भाजपातर्फे आज दोन्ही पदासांठी नामांकन पत्र मनपातून घेण्यात आले.
याप्रसंगी भाजपाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेते भगत बालाणी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, नगरसेवक विशाल त्रिपाठी आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलतांना दीपक सूर्यवंशी व भगत बालाणी यांनी या दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध होणार, असा आत्मविश्वास व्यक्त केला. मात्र या पदांवर कोणाला संधी मिळणार याबाबत मौन पाळले. दरम्यान माजी मंत्री आ. गिरीष महाजन व आ. राजूमामा भोळे हे दोन्ही पदांबाबतची नावे निश्चित करतील व त्यांनाच संधी मिळणा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापौर व उपमहापौर या पदांवरून पक्षात कोणताही वाद नसल्याचेही त्यांनी ठासून सांगितले.
असे असली तरी महापौर पदासाठी प्रतिभाताई आबा कापसे व ज्योतीताई बाळासाहेब चव्हाण यांची नावे आघाडीवर असल्याचे वृत्त आहे.