महापौर महाजनांच्या मागणीला यश, मनपा करभरणा केल्यास मिळणार मोठी सूट

0
16

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील करवसुली वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून मालमत्ता कर भरणा केल्यास शास्तीमध्ये सूट देण्यात येत होती. महापालिका प्रशासनाच्या अभय योजनेला उत्तम प्रतिसाद लाभल्याने योजना पुन्हा कार्यान्वित केली जावी, अशी मागणी करणारे पत्र महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली होती.

महापौर महाजन यांच्या या मागणीला यश आले असून, अभय योजना जळगावकरांसाठी पुन्हा दोन महिन्यांसाठी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 रोजी महापालिका प्रशासनाने तसे आदेशही काढले आहेत.

मालमत्ता कराचा भरणा वाढवून महापालिकेच्या करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अभय योजनेंतर्गत जुलै महिन्यापर्यंत सूट देण्यात येत होती. महापालिका प्रशासनाला अभय योजनेत उत्तम प्रतिसाद लाभल्याने योजना पुन्हा कार्यान्वित व्हावी, अशी मागणी करणारे पत्र ऑगस्ट महिन्यात महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी महापालिका आयुक्तांना दिले होते.

महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या या मागणीला यश आले असून, 15 नोव्हेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 पर्यंत अभय योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 15 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2021 पर्यंत करभरणा केल्यास 90 टक्के शास्ती माफी मिळेल. तसेच 15 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान कराचा भरणा केल्यास शास्तीत 75 टक्के, तर 1 ते 15 जानेवारी 2022 पर्यंत भरणा केल्यास शास्तीत 50 टक्के सूट दिली जाणार आहे. थकबाकीदारांना सवलत दिल्यास अनेक वर्षांपासूनची थकीत रक्कम महापालिकेला मिळू शकते, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सलग दुसर्‍या वर्षी ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here