मलिकांचा मोठा गौप्यस्फोट: बाळासाहेबांची भाजपासोबतची युती तोडण्याची मानसिकता होती

0
7

मुंबई : शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असताना शिवसेनेने भाजपासोबत (BJP) युती तोडण्याची मानसिकता तयार केली होती. शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्यावेळी काही कारणास्तव दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकले नाहीत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला. यावेळी मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला आहे.

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी युतीतून बाहेर पडण्याचाही विचार केला होता. दहा वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी भाजपासोबतची युती तोडण्याची मानसिकता केली होती. आम्ही काँग्रेससोबत असताना राष्ट्रवादीने सोबत यावे, असा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता. मात्र, काही कारणास्तव दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकले नाहीत. पण २०१९ मध्ये आघाडीचा निर्णय झाला, असे मलिक म्हणाले.

भाजपामुळे शिवसेनेचे खच्चीकरण
दिल्लीच्या मदतीने शिवसेना संपवण्याचे राजकारण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. मात्र, आता भाजपाला शिवसेना काय आहे हे समजू लागले आहे, त्यामुळे ते अशाप्रकारची विधाने करत आहेत. पाच वर्षांच्या निकालावर नजर टाकली तर भाजपामुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले आहे. ‘२५ वर्ष भाजपासोबत युतीत सडलो,’ असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मात्र आता शिवसेनेची ताकद वाढतीवर आहे, असे म्हणत भाजपा ज्या पक्षांसोबत युती करतो त्यांचे खच्चीकरण करतो, हे सेनेला आधीच कळले होते. त्यामुळे शिवसेनेने भूमिका घेत भाजपाला बगल दिली. शिवसेनेसोबत भाजपा मोठी झाली, हे फडणवीसांना आता कळले. परंतु आठ वर्षांपासून फडणवीस शिवसेनेला संपवण्याचे राजकारण करत होते, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here