मलकापूर ः प्रतिनिधी
तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आरक्षण तहसील कार्यालयात तहसीलदार डोईफोडे व कर्मचार्यांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आली. महिला आरक्षणाबाबतची सोडत गुरुवार दि.१० डिसेंबर रोजी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घोषित करण्यात आली.
संबंधित ग्रामपंचायतींमधील वार्डनिहाय आरक्षण यापूर्वीच त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये जाहीर करण्यात आलेले आहे.
जाहीर करण्यात आलेल्या ४९ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत पुढील प्रमाणे.- अनुसूचित जाती(एससी) वडोदा, हिंगणा काजी, लासुरा, हरसोडा, वाघुड, पिंपळखुटा बुद्रुक, निमखेड व म्हैसवाडी. अनुसूचित जमाती (एसटी)-काळेगाव, वरखेड, बहापुरा, देवधाबा. नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या प्रवर्गातील एकूण १३ ग्रामपंचायतींपैकी पुढील ५ ग्रामपंचायतींची सोडत चिठ्ठ्या टाकून वडोदा येथील लहान बालक रोशन याचे हस्ते पुढील पाच गावांच्या चिठ्ठ्या निवडून निश्चित करण्यात आली. चिखली, जांभूळधाबा, लोनवडी, पिंपळखुटा महादेव, तिघ्रा. उर्वरित ८ ग्रा.पं. अशा आहेत – गोराड, तालसवाडा, खामखेड, माकनेर, उमाळी, आळंद, मोरखेड बुद्रुक, विवरा.
सर्वसाधारण प्रवर्ग (जनरल)-वडजी, भालेगाव, भानगुरा, हरणखेड, वाकोडी, दुधलगाव खुर्द, झोडगा, शिराढोण, नरवेल, दसरखेड, निंभारी, घिर्णी, कुंड बुद्रुक, पान्हेरा, दाताळा, भाडगणी, मलकापूर ग्रामीण, दुधलगाव बुद्रुक, बेलाड, वाघोळा, धरणगाव, कुंड बुद्रुक, अनुराबाद, व तांदुलवाडी.