मलकापूर ः प्रतिनिधी
येथील अहेमद शहापुरा भागात पोलिसांनी अचानक टाकलेल्या छाप्यात दोन तलवारींसह एका संशयित तरुणास अटक केल्याचे वृत्त आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांना गोपनिय माहिती मिळाली की, पारपेठ भागातील अहेमदशहापुरा येथे एक इसम नामे सैय्यद अन्सार सैय्यद रुस्तम याने आपल्या राहत्या घरात दोन तलवारी लपवून ठेवल्या आहेत. त्यानुसार त्यांचे मार्गदर्शनाखाली डी.बी.पथकाचे सपोनि श्रीधर गुट्टे, स.फौ.रतनसिंह बोराडे, पो.कॉ.समाधान ठाकुर, पो.कॉ.आसिफ शेख, पो.कॉ संजय पढार, पो.कॉ. ईश्वर वाघ, पो.कॉ संतोष कुमावत, पो.कॉ अनिल डागोर, पो.कॉ.प्रकाश(गोटु)जाधव, पो.कॉ सलिम बरडे यांनी सदर व्यक्तीस ताब्यात घेतले व त्यास त्याचे नांव गांव विचारले असता, त्याने त्याचे नांव सैय्यद अन्सार सैय्यद रुस्तम (वय २४ वर्ष) रा.अहेमदशहापुरा पारपेठ मलकापूर असे सांगितले. नंतर त्याचे राहते घराची पंचा समक्ष सपोनि श्रीधर गुढे यांनी घरझडती घेतली असता ५ रुपये किंमतीच्या दोन स्टीलच्या तलवारी मिळुन आल्याने त्या जप्त करण्यात आल्या. सदर तलवारी त्याने शे.रेहान ऊर्फ रिजवान शे बुढन( वय २३) रा.पांढरी मलकापुर याचेकडुन विकत घेतल्याचे सांगितल्याने शेख रेहान यास ताब्यात घेवुन त्यास अटक करण्यात आली.याबाबत मलकापूर शहर पो.स्टे.ला कलम आर्म अॅक्ट ४,२५ म.पो.का १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही अरविंद चावरिया,पोलीस अधिक्षक बुलडाणा, मा.हेमराजसिंह राजपुत, अप्पर पोलीस अधिक्षक खामगांव, मा.रमेश बरकते उपविभागिय पोलीस अधिकारी बुलडाणा , यांचे मार्गदर्शनाखाली मलकापुर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे .