जळगाव, प्रतिनिधी । राजमाता जिजाऊंचा ४२४ वा जयंती सोहळा आज जळगाव शहरात मराठा सेवा संघातर्फे उत्साहात पार पडला. यावेळी मराठा सेवा संघाचे महानगराध्यक्ष व शाखा अभियंता श्री. हिरामणराव चव्हाण यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना चव्हाण म्हणाले की, जिजाऊंनी आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रमासह सत्त्वगुणांचे बाळकडू दिले माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाबाईचं असू शकतात. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य संकल्पनेची बी मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये त्यांनी निर्माण केला असे ते म्हणाले. यावेळी विभागिय अध्यक्ष सुरेन्द्र पाटील, सुरेश पाटील, विभागिय कार्याध्यक्ष राम पवार, जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, जिल्हा प्रचारक दिनेश कदम, जिल्हा सचिव संजय पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष सुमित पाटील, महानगर सचिव चंद्रकांत देसले, सहसचिव सचिन पाटील, महानगर कार्याध्यक्ष हर्षल गरुड, संघटक महेंद्र पाटील, उपाध्यक्ष अमित पाटील, दिनकर मराठे, ज्ञानेश्वर साळूंखे, विजय शिंदे, सचिन पवार व आदि प उपस्थित होते.