“मराठा सेवा संघाचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यन्त पोहचवा

0
29

जळगाव, प्रतिनिधी । मराठा सेवा संघाची बैठक नुकतीच अशोकराव महल्ले यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समाजातील सर्व घटकांसाठी मराठा सेवा संघाचे विधायक कार्य प्रत्यक्ष पोहचवा असे आवाहन करण्यात आले.

आपण मराठा सेवा संघासाठी आतापर्यंत काय केले याचेही लिखाण करावे व समाज प्रबोधनाचे मुद्दे मांडून ते प्रकाशित करावेत यामुळे समाज नक्कीच आकर्षित होईल असे महत्त्वपुर्ण शिवविचार मांडले.यावेळी मा.विभागिय अध्यक्ष भाऊसो सुरेश पाटील यांनी आतापर्यंत जळगांव मराठा सेवासंघाने केलेल्या सर्वसमावेशक कार्याबाबत व कार्याचा ठसा कसा उमटविला याबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी मा.विभागिय अध्यक्ष सुरेन्द्र पाटील, विभागिय कार्याध्यक्ष राम पवार, जिल्हाध्यक्ष अनिल पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष सुमित पाटील ,महानगर अध्यक्ष हिरामण चव्हाण ,महानगर सचिव चंद्रकांत देसले , महानगर ऊपाध्यक्ष , मधुकर पाटील ,महानगर ऊपाध्यक्ष संदिप पवार ,महानगर कार्याध्यक्ष सचिन पवार , महानगर ऊपाध्यक्ष योगेश पाटील ,आदिंची प्रमुख ऊपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here