मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिवस साजरा

0
18

जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र जनक्रांती मोर्चातर्फे मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापनदिन साजरा करत नामांतर आंदोलनातील शहीद भीमसैनिकांना आदरांजली अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, रमेश सोनवणे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात शहीद झालेल्या जनाधन मावाळे, पोचीराम कांबळे, सुहासिनी बनसोळे, गौतम वाघमारे, दिलीप रामटेके, आदी भीमसैनिकांना आदरांजली अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५० साली औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून मराठवाडया सारख्या मागासलेल्या प्रदेशाला शिक्षणाची व्यवस्था करून दिली व हैदराबादवर अंवलबून असलेल्या मराठवाड्यात शैक्षणिक क्रांतीला सुरुवात झाली. बाबासाहेबांच्या या शैक्षणिक प्रयत्नामुळेच १९५८ साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला द्यावे अशी मागणी सर्वप्रथम १९७४ या वर्षी करण्यात आली. सार्वजनिक रित्या १९७७ दलित संघटनांनी नामांतराची मागणी करून प्रत्यक्ष आंदोलनाला सुरुवात केली याचे फलित म्हणून २७ जुलै १९७८ साली महाराष्ट्र शासनाने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव पास करून मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव द्यावे परंतु महाराष्ट्र शासनाने या ठरावाची अंमलबजावणी केलीच नाही आणि म्हणून नामांतर वादी दलित संघटनांनी सातत्याने जनआंदोलन केले ही लढाई १४ वर्ष चालू होती तेव्हा महाराष्ट्र शासनाने १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला तेव्हापासून १४ जानेवारी मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे अशी माहिती महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रा. प्रितीलाल पवार यांनी यावेळी दिली. याप्रसंगी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, प्रा. प्रीतिलाल पवार, चंदन बिराडे, नाना मगरे, रमेश सोनवणे, कृष्णा सपकाळे, संदीप सोनवणे, संजय तांबे, जयपाल धुरंदर ,भारत सोनवणे,अनिल सुरळकर कैलास तायडे, राजू मोरे, यशवंत मोरे, हरिचंद्र सोनवणे, श्रीकांत मोरे, अखिल खान, कृष्णा सपकाळे, किरण ठाकूर, राजू महाले,विनोद सपकाळे, आनंदा तायडे, यशवंत घोडेस्वार, गौतम सपकाळे, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here