मनी लाँडरिंग प्रकरणी नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा.

0
6
जामनेर (प्रतिनिधी):–  देशातील राष्ट्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालय यांनी दिनांक 23 रोजी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करून मोठा गौप्य स्पोट केला आहे. सदर बाब अत्यंत गंभीर आहे .या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय असून भ्रष्टचारी मंत्री नवाब मलिक हे जोपर्यंत या पदावर राहतील तोपर्यंत निष्पक्ष चौकशी होणार नाही. म्हणून नवाब मलिक यांनी अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. ते राजीनामा देणार नसतील तर माननीय मुख्यमंत्री व माननीय शरद पवार साहेब यांनी त्यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी. या  प्रकरणाची राष्ट्रीय तपासणी यंत्रणेमार्फत सखोल चौकशी  करण्यात यावी व राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. अशी मागणी जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने नायब तहसीलदार डॉ. चैताली दराडे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. यावेळी प्रा. शरद पाटील, डॉ. प्रशांत भोंडे, जितेंद्र पाटील, चंद्रकांत बाविस्कर, नाना बावीस्कर, नवल पाटील,श्रीराम महाजन, डॉ. संजीव पाटील, सुहास पाटील, उल्हास पाटील, अतिश झाल्टे, सुधाकर माळी, संतोष बारी, दीपक तायडे,रतन गायकवाड, सुभाष पवार, अत किरण पाटील, अजय पाटील, हेमंत वाणी, मनोज जंजाळ, विलास ढाकरे, तेजस पाटील विनायक चौधरी ,नितीन झाल्टे, विजय शिरसाठ यांच्यासह असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here