जळगाव ः प्रतिनिधी
केंद्र सरकारने शेतकरी विरोधात केलेल्या तिन्ही कायद्याच्या प्रतीची होळी भारत बंदच्या वेळी शहरातील सुभाष चौक येथे विविध पक्षांचे राजकीय नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्या साक्षीने करून आपला निषेध नोंदविला.
सर्वप्रथम बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी त्या कायद्यांचे थोडक्यात वाचन केले. काळे कायदे रद्द करा अशी मागणी केली व ही मागणी मंजूर होईपर्यंत या कायद्याच्या पुस्तकांची होळी वारंवार करत राहू असे सुद्धा अभिवचन दिले. यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादीचे गफ्फारभाई मलिक, वाल्मिक पाटील, शिवसेनेचे विष्णू भंगाळे समाजवादीचे रईस बागवान, कॉंग्रेसचे सरचिटणीस जमील शेख, माजी आमदार मनीष जैन, एमआयएमचे झिया बागवान, काद्रिया फौंडेशनचे फारूक कादरी, फहिम पटेल, अमन फौंडेशनचे सैयद शाहिद तसेच मनियार बिरादरीचे अब्दुल रउफ, हरीश सय्यद, मोहसीन युसूफ, मुजाहिद खान, अखतर शेख , रफिक शेख, मुस्तकीम मुसा, तनविर करीम, मोहसीन शाह आदींची उपस्थिती होती